मुंबई : कोरोना काळात कार्यक्रमांना गर्दी करण्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसवर सध्या टीका होत आहे. त्यात पुण्यातील कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. कोरोनाची भीती असतानाही अजित पवार यांनी कार्यक्रमाला गर्दी जमवल्यावरुन भाजप त्यांच्यावर टीका करतेय. त्यात भाजप नेते गोपीचंद पडळकर यांचाही समावेश आहे. मात्र, पडळकरांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने चेतावणी देण्यात आलीय. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरच चव्हाण यांनी या संदर्भात पडळकरांवर टीका केली.
अजित पवार यांच्या विरोधात गोपीचंद पडळकर यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. तेव्हापासूनच पडळकर आणि पवार यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्याचा संदर्भ देत सूरज चव्हाण यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पडळकर यांच्यावर ही टीका केलीय. चव्हाण यांनी लिहिले की, ‘गोपीचंद पडळकर एक गोष्ट लक्षात ठेवा पवार साहेब, अजित दादा पवार यांच्यावर टीका केल्यावर माध्यमात प्रसिद्धी भेटते पण टीका कमरेखाली गेली की ‘प्रसाद’ही भेटतो हे लक्षात ठेवावं.’
गोपीचंद पडळकर एक गोष्ट लक्षात ठेवा पवार साहेब,अजित दादा पवार यांच्यावर टीका केल्यावर माध्यमात प्रसिद्धी भेटते पण टीका कमरेखाली गेली की "प्रसाद"ही भेटतो हे लक्षात ठेवावं.@NCPspeaks @PawarSpeaks @AjitPawarSpeaks
— Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) (@surajvchavan) June 21, 2021
सध्या राज्यात शिवसेना आणि भाजप यांच्यात चांगलाच वाद पेटलाय. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही उडी घेतलीय. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने भाजपला देण्यात आलेली ही चेतावणीच म्हणावी लागेल. गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात अशा प्रकारच्या ‘प्रसादा’ची खुपच चर्चा सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून मविआ सरकार अस्थिर करण्याचे षडयंत्र – नाना पटोले
- ‘आमच्याकडे अजून तो आजार आलेला नाही, शिवसेनेत फक्त बाळासाहेब ठाकरे हा एकमेव गट’
- ‘अधिवेशन जवळ आलं की कोरोना रुग्णांचे आकडे वाढतात’; प्रवीण दरेकरांची टीका
- दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी ३०९ धावांचे लक्ष्य
- देशात आज विक्रमी लसीकरण ; तब्बल ‘इतक्या’ लोकांनी घेतली आज लस


