Share

‘पवारांचा हा काही पहिला प्रयत्न नाही, तर…’; पवार-किशोर भेटीवर काँग्रेसची खोचक प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता दिसून येत आहे. सध्या महाराष्ट्रात कॉंग्रेस,शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाविकास सरकार आहे. परंतु कॉंग्रेस सातत्त्याने आगामी निवडणुकींसाठी स्वबळाचा नारा देत असताना दिसत आहे. त्यातच शिवसेनेच्या वर्धापन दिनी शिवसेनापक्ष प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधून बोचरी टीका केली.

तर काल शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचं लेटरबॉम्ब समोर आलं आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. महाराष्ट्रातील अशा राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कालच अचानक दिल्ली गाठली. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लगावले जात आहेत. या दिल्ली दौऱ्यामध्ये शरद पवार नेमके कोणा-कोणाला भेटणार ? या अचानक ठरवलेल्या दौऱ्याचे नेमके कारण काय ? असे एक न अनेक प्रश्न सध्या ऐरणीवर आले आहेत. दरम्यान, काही वेळेपूर्वीच पुन्हा एकदा निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतल्याचे समोर आले आहे.

पवार-किशोर यांची ही दुसरी भेट असून या दोघांमध्ये नेमकं कोणत्या विषयावर खलबतं झाली हे मात्र गौप्यच आहे. भाजप विरोधात सक्षम विरोधी आघाडी निर्माण करण्यासाठी शरद पवार यांनी हालचाली सुरु केल्या असून इतर राज्यातील भाजप विरोधी प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्याची रणनीती ते आखत आहेत. यासोबतच, राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता आघाडीत बिघाडी झाल्यास मध्यावधी निवडणुकांच्या तयारीबाबत देखील या दोघांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्या या भेटीगाठींवर आणि देशपातळीवर नवी विरोधी आघाडी स्थापन करण्याच्या प्रश्नावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिलं आहे. पवार साहेबांचा हा काही पहिला प्रयत्न नाही. ज्या ज्या वेळी राजकीय समीकरण बदलतात, राजकारणात वेगळे वारे वाहू लागतात तेव्हा पवारांनी अशा भूमिका घेतलेल्या आहेत. त्यामुळे यात काही नवीन आहे असं म्हणणं चुकीचं असल्याचं भाष्य नाना पटोले यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!