Share

पुण्यात तुफान गर्दी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक

Published On: 

🕒 1 min read

पुणे : पुण्यात परवा दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यालयाचा उद्घाटनाचा कार्यक्रम राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात प्रचंड गर्दी उसळली होती. त्यामुळे संपूर्ण राज्यभरातील नागरिकांकडून यावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. पुण्यातील निर्बंध हळूहळू शिथील होत आहेत. मात्र, विकेंड लॉकडाऊन अद्यापही कायम असून शनिवार-रविवार पुण्यात केवळ अत्यावश्यक सुविधा वगळता इतर निर्बंध कायम आहेत.

पण असे असले तरी आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेली तुफान गर्दी पाहून कोरोनाचं गांभीर्य नाहीये का? असा प्रश्न उपस्थित होत होता. अजित पवार कार्यक्रमस्थळी पोहोचण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर तुफान गर्दी केली होती. कोविड प्रतिबंधक नियमांचे सर्रास उल्लंघन यावेळी पहायला मिळाले. या प्रकरणानंतर विरोधकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर चांगलीच टीकेची झोड उठवली होती.

काल सोशल डिस्टसिंगचे पालन न करता अटी व नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह १०० ते १५० जणांवर गुन्हा दाखल केला होता. आणि आज या प्रकरणी पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक करण्यात आली होती. मात्र जामीन मिळताच त्यांची अवघ्या काही वेळात सुटकाही झाली. जगताप यांच्यासह 100 ते 150 कार्यकर्त्यांवर पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीच्या दीडशे ते दोनशे पदाधिकाऱ्यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक देखील केली होती. मात्र पोलिसांनी जामीन मंजूर करत त्यांची सुटकाही केली. दरम्यान यानंतर प्रशांत जगताप यांनी यासाठी दिलगिरी व्यक्त केली आहे. पुढच्या काळात नियमांची पायमल्ली करणार नाही. सर्व नियम पाळू. गर्दी जमवल्या प्रकरणी आम्ही पुणे शहराची दिलगिरी व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया प्रशांत जगताप यांनी यावेळी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!