Share

‘आणि आई ठणठणीत बरी झाली’, योगामुळे आईने गंभीर आजारावर मात केल्याचा कंगणाचा अजब दावा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलीवुड अभिनेत्री कंगना रनौत तिच्या धडाकेबाज वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. अनेकदा तिच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाले आहेत. तिच्या या वक्तव्यामुळे ती कायमच चर्चेत राहिली आहे. मात्र यावेळी ती तिच्या पासपोर्टमुळे चर्चेत आली आहे. मात्र आजच्या आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त कंगनाने एक पोस्ट शेअर केली आहे आणि यात तिने योगा केल्याने तिच्या कुटुंबियांच्या  प्रकृतीत सुधारणा झाल्याचे सांगितले आहे.

कंगना रनौतने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दोन फोटोज शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिचे आई-वडील योगा करताना दिसून येत आहेत. यासोबतच योगामुळे तिची आई अवघ्या दोन महिन्यातच बरी झाली असल्याचं तिने सांगितले आहे.  कंगनाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘२१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिवस आहे आणि मला माझी योगा स्टोरी शेअर करायची आहे. मी कसा आणि कधी योगा सुरू केला, हे सर्वांनाच माहित आहे. पण माझ्या कुंटुंबाने कधी आणि कसा योगा सुरू केला, हे कुणाला माहित नाही. सुरवातीला काहींनी विरोध तर काहींनी स्विकार केला.’

https://www.instagram.com/p/CQVNTBdhKTC/?utm_source=ig_web_copy_link

पुढे कंगनाने सांगितले की, ‘काही वर्षापूर्वी माझ्या आईला डायबिटीस, थायरॉइड आणि हाय लेवल कोलेस्ट्रॉल सारख्या गंभीर आरोग्य समस्या होत्या. डॉक्टरांनी तर तिला ओपन हार्ट सर्जरी करण्यासाठी सांगितलं होते. डॉक्टरांनी ओपन हार्ट सर्जरीचा सल्ला दिल्यानंतर डोळ्यात अश्रु आले आणि मी आईला म्हणाली, मला तुझ्या जीवनातले फक्त दोन महिने दे, त्यांच्या ह्दयावर इतकी मोठी सर्जरीची रिस्क घ्यायची नव्हती. माझ्यावर आईने विश्वास ठेवला आणि अखेर मी यात यशस्वी झाले. आज तिला कोणताच आजार नाही. ती आता आमच्या कुटूंबातील सर्वात निरोगी व्यक्ती आहे.’

तर वडिलांबद्दल बोलताना तिने सांगितलं, ‘जास्त चालण होत असल्याने वडिलांचे गुडघे दुखत होत. त्यावेळेला मला आणखी एक संधी मिळाली आणि मी त्यांना योगा करण्याची सवय लावली. आता ते जॉगिंग सुद्धा करतात. आज मी हे गर्वाने सांगू शकते की मी माझ्या कुटुंबाला योगाचं गिफ्ट दिल आहे. एक आनंदी कुटुंब, जगात अशी कोणतीच गोष्ट नाही की ती आपल्याला सहज मिळते. त्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते. आता प्रत्येक दिवशी सकाळी मी वडिलांना फोन करते आणि योगा केलंत का असा प्रश्न विचारते. आज त्यांनी मला हिमाचल प्रदेशमधून हे दोन फोटोज पाठवले आहेत. तुम्ही तुमच्या कुटुंबाला काय देत आहात?’, असेही तिने तिच्या पोस्टमधून विचारले आहे.

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिचा बहुप्रतिक्षित ‘थलावी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पण कोरोनाचा धोका वाढत असल्याने कंगनाचा हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झाला नाही. थालाईवी व्यतिरिक्त कंगनाच्या तेजस, धाकड या  चित्रपटात देखील ती दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!