🕒 1 min read
नवी दिल्ली: अनेक लोकांचे कार घेण्याचे स्वप्न असते. परंतु सध्या कारच्या किमती अधिक असल्याने सामान्य माणसाला ते परवडणे कठीण आहे. मात्र सध्या बाजारात एक अशी कर आली असून त्या कारची किमत सामान्य वर्गाला परवडणारी आहे. त्यामुळे आता मारुती ऑल्टो भारतात विक्री होणाऱ्या सर्वात स्वस्त कारमध्ये सामिल आहे. ऑल्टो कारची या सेगमेंटमध्ये नेहमीच मोठी मागणी राहिली आहे.
कंपनीने या कारचे एकूण 6 वेरिएंट बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. या कारच्या बेस मॉडेलची किंमत 2.99 लाख रुपये आहे. तर कारच्या टॉप वेरिएंट VXi प्लसची किंमत 4.60 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. कंपनीने आपल्या या कारमध्ये 796cc क्षमतेच्या पेट्रोल इंजिनचा वापर केला आहे, जो 60Nm टॉर्क आणि 40.3bhp पॉवर जनरेट करतो. या कार्सच्या सर्व वेरिएंटमध्ये एकाच प्रकारच्या इंजिनचा वापर केला गेला आहे. या सर्व कार वेरिएंटचं मायलेज जवळपास 22 किलोमीटर प्रति लीटर आहे.
स्टँडर्ड सेफ्टी फीचर्ससह या कारमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, इलेक्ट्रिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्यूशन, रिवर्स पार्किंग सेंसर, स्पीड अलर्ट सिस्टम, हाय माउंटेड स्टॉप लँप, इमोबिलायजर, फ्रंट वायपर आणि वॉशर, ड्रायव्हर साईड एअरबॅग आणि हेडलाईट लेवलिंग असे फीचर्स मिळतात. या कारच्या स्टँडर्ड वेरिएंटची किंमत 2.99 लाख रुपये आहे. तर याच्या स्टँडर्ड ऑप्शनल वेरिएंटची किंमत 3.4 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
मारुतीच्या या कारमध्ये स्टँडर्ड वेरिएंटमध्ये मिळणाऱ्या फीचर्ससह फुल व्हिल कवर्स, बॉडी कलर्ड बंपर आणि डोर हँडल देण्यात आले आहेत. फ्रंट पॉवर विंडो, इंटिग्रेटेड सीट हेडरेस्ट, रिमोट बूट लिड ओपनर, चाईल्ड लॉक, ELR सीट बेल्ट्स सारखे फीचर्स सामिल आहेत. या कारची किंमत 3.76 लाख रुपये आहे. तर कारच्या ऑप्शनल वेरिएंटची किंमत 3.80 लाख रुपये आहे. याच्या ऑप्शनल वेरिएंटमध्ये ड्रायव्हर साईड एअरबॅगही आहे. तर मारुती ऑल्टो कारमध्ये LXi वेरिएंटशिवाय रियर व्ह्यू मिरर, सेंटर डोर लॉक, किलेस एन्ट्री, अॅक्सेसरी सॉकेट, ऑडिओ सिस्टम, USB आणि ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी, 2 फ्रंट स्पीकरसारखे फीचर्स आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- अजितदादा… हे वागणं बरे नव्हे… आरोग्य कर्मचाऱ्यांवर लाठीचार्ज होणे हे संतापजनक आहे
- बीडमध्ये सध्या आंदोलनाचे वारे; आता २१ जूनला ‘रास्ता रोको’
- ‘१२ वी नापास पण टीका करण्यात अव्वल’ ; केआरकेने पुन्हा एकदा साधला कंगनावर निशाणा
- पहिल्या दिवशी वरुणदेवाने बॅटिंग केल्यामुळे खेळ वाया; दुसऱ्या दिवशीही पावसाची शक्यता
- ‘आम्ही एक महान खेळाडू गमावून बसलो’ ; मोदींनी व्यक्त केल्या भावना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
