🕒 1 min read
इंग्लंड : जागतिक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेला आज पासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेला फक्त एकच तास उरला आहे. सगळीकडे या सामन्याची उत्सुकता लागली आहे. या सामन्यासाठी भारत आणि न्युझीलंड दोन्ही संघ साउथहॅमप्टटनमध्ये आहेत. आज दुपारी ठीक अडीज वाजता विराट आणि केन नाणेफेकीसाठी मैदानात येणार होते. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंडच्या अंतिम सामन्याला ठीक तीन वाजता सुरु होणार होती. मात्र आता क्रिकेट रसिकांसाठी एक अत्यंत वाईट बातमी समोर येत आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यावर पहिल्याच दिवशी मात्र पावसाचं सावट असल्याचं दिसत आहे. इंग्लंडमध्ये पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे सामन्यात अडथळा आला आहे. या सामन्याची सुरुवात आता उशिरा होणार आहे.
Good morning from Southampton. We are just over an hour away from the scheduled start of play but It continues to drizzle here. The match officials are on the field now. ☔ #WTC21 pic.twitter.com/Kl77pJIJLo
— BCCI (@BCCI) June 18, 2021
अंतिम सामन्याआधी साऊथॅम्प्टनचे हवामान खूपच खराब असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान अहवालानुसार 18 ते 22 जून दरम्यान साऊथॅम्प्टनमध्ये पावसाची शक्यता आहे. दोन दिवस पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. याचा परिणाम अंतिम सामन्यावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामने पुढे जाऊ शकतात किंवा त्यांच्या वेळेत बदल होऊ शकतो. अशा परिस्थितीत पहिल्या दिवसाचे पहिले सत्र पावसामुळे रद्द किंवा पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘तुला प्रोटोकॉल कळतो का रे?’, अजित पवारांनी बीडच्या मुख्याधिकाऱ्यांना झापले
- ‘तुम्ही काळजी करू नका, आमचं व्यवस्थित सुरुये!’, आघाडीत बिघाडीच्या चर्चेवर अजितदादांचे स्पष्टीकरण
- नितीन गडकरींना धक्का! अमरावतीचे डॉ.सुनील देशमुख काँग्रेसमध्ये
- पालकमंत्री देशमुख यांच्या हस्ते विविध विकासकामांना प्रारंभ, नव्या बससेवेचेही उद्घाटन
- नताशा, देवांगना, आसिफला मिळालेला जमीन सरकारच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
