Share

पहा नेमके कोण आहेत? सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे कपल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आजच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणताही व्हिडीओ आणि फोटो अगदी क्षणार्धात व्हायरल होतो. याच माध्यमाचा वापर करून अनेक लोकांना प्रसिद्धी मिळाली आहे. तसेच यामुळे अनेक  खऱ्या खोट्या गोष्टी समोर येत असतात. त्यामुळे सध्याच्या काळात सोशल मिडिया हे माध्याम प्रचंड शक्तीशाली माध्यम म्हणून ओळखले जाते.

अशातच नुकतेच प्रसिद्धीच्या झोतात असणारे सचेत टंडन आणि परंपरा ठाकूर या जोडीने त्यांच्या  आवाजाने तरुण वर्गाला अक्षरश भुरळ पडली आहे. दोघांच्या गाण्याचे व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होतं आहेत.

https://www.instagram.com/p/CPP4bsnBH1a/?utm_source=ig_web_copy_link

सचेत टंडन आणि परंपरा ठाकूर या दोघांनी एका टीव्ही शोमधून आपल्या करीयरची सुरुवात केली होती. छोट्या पडद्यावरील सिंगिंग शो ‘द वॉइस’ च्या पहिल्या पर्वात हे दोघेही स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. आपल्या आवाजाच्या जोरावर हे दोघे फायनल ४ मध्ये पोहचले होते. या शोनंतर दोघेही रिलेशनशिपमध्ये आले आणि २०२० मध्ये दोघे विवाह बंधनात अडकले.

शाहिद कपूर आणि कियारा अडवानी यांच्या सुपरहिट ‘कबीर सिंग’ या चित्रपटातील सुपरहिट गाणं बेखयाली हे यांनीचं गायिलं आहे. परंपराने आपल्या दमदार आवाजात श्रद्धा कपूर आणि वरून धवनच्या ‘स्ट्रीट डान्सर’ चित्रपटातील मुकाबला गाणं गायले  आहे. तसेच अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकरच्या ‘टॉयलेट’ या चित्रपटातील काही गाणीसुद्धा या दोघांनी गायिली आहेत. तसेच त्यांना संगीतसुद्धा दिलं आहे.

https://www.instagram.com/p/CPukSyUBw-h/?utm_source=ig_web_copy_link

मात्र बॉलीवूड मध्ये देखील गाणी गायल्यानंतर त्यांना खरी ओळख त्यांच्या सोशल मीडीयावरील ड्यूएट गाण्यांचे व्हिडीओमुळे मिळाली आहे. त्यांच्या गाण्याला चाहत्यांनाकडून भरभरून दाद मिळत आहे. दोघांच्या ‘मीरा के प्रभू’ या व्हिडीओला तब्बल ३ करोडपेक्षा जास्त लोकांनी पहिलं आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त या जोडप्याचीच चर्चा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!