Share

गाझियाबाद प्रकरणाविषयी ट्विट करत जावेद अख्तरांनी व्यक्त केला संताप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : उत्तर प्रदेशामधील गाझियाबादमध्ये एका वयस्कर व्यक्तीला झालेल्या मारहाणीच्या व्हायरल व्हिडीओवरून सध्या वाद निर्माण होत आहे. या वयस्कर व्यक्तीचा  व्हिडीओ कोणतीही शहानिशा न करता व्हायरल केल्याने तिच्यासह ट्विटर इंडियाचे प्रमुख मनीष माहेश्वरे यांच्यासह अन्य काही जणांवरविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी आता जावेद अख्तर यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.

जावेद अख्तर यांनी ट्विट करत लिहिले की, ‘मी अशा लोकांचा विचार करतोय ज्यांनी निर्दोष लोकांना जाणूनबुजून अटक केली, त्यांना मारहाण केली, तुरुंगात डांबलं, खोटे पुरावे व साक्षीदार सादर केले आणि आता स्वत:च्या घरी जाऊन कुटुंबीयांसोबत मस्त वेळ घालवत आहेत. मुलांसोबत खेळतायेत. चांगलं जेवण करतायेत. ही लोक आपल्या निरागस मुलांच्या नजरेना नजर देऊन कसे काय जगू शकतात कोण जाणे,’ सध्या या ट्विटची चांगलीच चर्चा रंगली आहे.

गाझियाबाद पोलिसांनी या प्रकरणामध्ये पत्रकार मोहम्मद झुबैर, राणा आयुब यांनी या प्रकरणासंदर्भात ट्विट केल्याने त्यांच्या नावाचाही एफआयआरमध्ये समावेश केला आहे. याशिवाय काँग्रेस नेते सलमान नाझमी, शमा मोहम्मद आणि मसकुर उस्मानी, लेखिका साबा नक्वी, द वायर ही कंपनी, ट्विटर आयएनसी आणि ट्विटर कम्युनिकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडविरोधात गुन्हा दाखल केला.

दिल्लीतील टिळक मार्ग पोलीस ठाण्यात वकील अमित आचार्य यांनी ही तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन दिल्ली पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केला नाही. मात्र पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे. दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत या सर्वांनी या व्हिडीओची सत्यता न पडताळता व्हिडीओ व्हायरल करून धार्मिक तेढ निर्माण केल्याचा प्रयत्न केल्याच सांगितेले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!