🕒 1 min read
मुंबई : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये मराठा क्रांती मूक आंदोलन यशस्वीपणे संपन्न झाले. आंदोलनानंतर मराठा समन्वयक आणि आंदोलकांशी संभाजीराजे यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे यांच्यात भेट होत आहे.
या भेटीत पाच मागण्या आणि मराठा आरक्षणावर चर्चा होणार आहे. मात्र, भेट सकारात्मक न झाल्यास काय होईल हे सांगायची गरज नाही, असा सूचक इशाराच संभाजी छत्रपती यांनी बैठकीपूर्वी दिला आहे. त्यामुळे आजच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. संभाजी छत्रपती यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
यापूर्वीच मुख्यमंत्र्यांना पाच मागण्या दिल्या आहेत. मूक आंदोलन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला चर्चेला बोलावलं. त्याचं मी स्वागत करतो. चर्चा सकारात्मक होईल याची अपेक्षा आहे. मात्र, चर्चा झाली नाही तर काय होईल हे मला सांगायची गरज नाही, असा सूचक इशारा संभाजीराजेंनी दिला आहे.
कोल्हापूरात झालेल्या मराठा मुक आंदोलनाचे परिणाम दिसत आहेत. सरकारने समाजाच्या मागण्याबाबत पहिले सकारात्मक पाऊल उचलले आहे. विचारविनिमय करण्यासाठी आज निमंत्रित केले आहे.
मराठा समाजाच्या वतीने राज्य समन्वयक व मी आज बैठकीला जाणार आहोत. समाजाच्या न्याय व हक्कासाठी कसलीही तडजोड नाही.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 17, 2021
तर, कोल्हापूरात झालेल्या मराठा मुक आंदोलनाचे परिणाम दिसत आहेत. सरकारने समाजाच्या मागण्याबाबत पहिले सकारात्मक पाऊल उचलले आहे. विचारविनिमय करण्यासाठी आज निमंत्रित केले आहे. मराठा समाजाच्या वतीने राज्य समन्वयक व मी आज बैठकीला जाणार आहोत. समाजाच्या न्याय व हक्कासाठी कसलीही तडजोड नाही. असं देखील संभाजीराजे यांनी ठणकावले आहे.
महत्वाच्या बातम्या
- रोनाल्डोच्या ‘त्या’ कृतीमुळे कोटींचं नुकसान ; कोका कोलाने दिली पहिली प्रतिक्रिया
- कशी वाटली जुनी शिवसेना? काल शिवसेना भवनासमोर तर आज सोशल मिडीयावर भिडले सेना-भाजपचे कार्यकर्ते
- ‘भाजपच्या त्या सो कॉल्ड नेत्यांनी फक्त वेळ आणि तारीख सांगावी, आम्ही पुन्हा मैदानात येऊ’
- व्हायरल व्हिडीओच्या त्या ट्विटमुळे स्वरा भास्कर सापडली अडचणीत
- ऑपरेशन मुस्कानमध्ये पोलिसांनी घेतला बेपत्ता झालेल्या ७ मुलींचा शोध
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
