औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) १५० कोटी रुपये खर्चून सुपर स्पेशालिटी वॉर्ड तयार करण्यात आला आहे. त्यात कॅथलॅब व सहा ऑपरेशन थिएटर्स तयार असून तज्ज्ञ डॉक्टरांअभावी या वॉर्डात एकही शस्त्रक्रिया झालेली नाही. पण हृदयशस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. आशिष भिवापूरकर यांना तीन वर्षांपासून दरमहा २ लाख ५३ हजार ५५४ रूपये वेतन अदा करण्यात येत असल्याचा खळबळजनक दावा खासदार इम्तियाज जलील यांनी बुधवारी(दि.१६) झालेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीत केला.
केवळ औरंगाबाद, मराठवाडाच नव्हे तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील हजारो रुग्णांसाठी घाटी रुग्णालय मोठा आधार आहे. मात्र, येथील आरोग्य यंत्रणेकडे राज्य शासनाचे कायम दुर्लक्ष होत आहे. उपचारासाठी मोठी यंत्रसामग्री दिली जाते. पण त्यासाठी आवश्यक असणाारे मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जात नाही. याच मुद्द्यावर आधारित याचिका खासदार इम्तियाज यांनी दाखल केली आहे.
खंडपीठाने राज्य शासनाला फटकारले
अर्थ नसलेली उत्तरे देऊ नका. किती दिवसांत घाटी, औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील आरोग्य यंत्रणेत आवश्यक डॉक्टर, कर्मचाऱ्यांची भरती करणार ते सांगा, अशा शब्दांत औरंगाबाद खंडपीठाने राज्य शासनास फटकारले. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, रवींद्र घुगे यांनी रिक्त जागा भरण्यासाठी काय कार्यवाही केली, अशी विचारणा राज्य शासनाकडे केली. राज्यभरात किती जागा रिक्त आहेत याविषयी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी शुक्रवारी (१८ जून) सविस्तर माहिती सादर करावी असे आदेशही खंडपीठाने दिले.
९७१ जागा रिक्त
जिल्हा परिषदेत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या ३३२, कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ३६४, जिल्हा सामान्य रुग्णालयात ६० जागा रिक्त आहेत. सुपरस्पेशालिटीत २१९ पैकी चारच जागा भरण्यात आल्या. २०१८ पासून २१५ जागा रिक्त आहेत. प्रथम, द्वितीय श्रेणीतील भरती राज्य लोकसेवा आयोगातर्फे होत असली तरी कोरोनाचे संकट लक्षात घेता तृतीय, चतुर्थ श्रेणीतील जागा तातडीने भरल्या पाहिजेत, असाही मुद्दा इम्तियाज यांनी मांडला.
महत्वाच्या बातम्या
- ‘पदोन्नती आरक्षणावर महाराष्ट्र ढवळून काढणार’, ऊर्जामंत्री राऊत यांचा इशारा
- ‘अश्विन आणि जाडेजा या दोघांनाही खेळवावे’ : सुनील गावस्कर
- दोन आठवड्यात मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमध्ये उभा राहणार ऑक्सिजन प्लांट!
- जगातील सर्वात मोठ्या तेल कंपन्यांपैकी एक फ्रान्सची टोटल एनर्जीज कंपनी करणार मराठवाड्यात गुंतवणूक!
- दानवे म्हणाले, ‘संजय राऊत चावी दिल्यावर बोलतात’; आता राऊतांच सडेतोड प्रत्युत्तर !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
