🕒 1 min read
मुंबई : आरेमध्ये मेट्रो कारशेड उभारण्यास प्रचंड विरोध झाल्याने महाविकास आघाडी सरकारने कारशेड आरेतून कांजूरमार्ग स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. सध्या यावरून जोरदार राजकारण सुरू आहे. याच दरम्यान भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जहरी टीका केली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडत महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. ‘चेहरा भोळा अन् भानगडी सोळा’ असं म्हणत कांजूरमार्ग कारशेडवरून शेलार यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.
मुंबई मेट्रो प्रकल्पावरुन आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबई मेट्रोचे काम ठप्प होणार? असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला आहे. गेले चार महिने जपान सरकार निधीचा चौथा टप्पा देण्यास तयार असतानाही ठाकरे सरकारने फंड नाकारला. वाढलेला 10 हजार कोटींचा खर्च आणि कारशेडचे न्यायप्रविष्टतेचे फसवे कारण देऊन निधी नाकारला. श्रेयाचे नारळ फोडायला मात्र पुढे आणि विकासात सदैव आडवे घोडे! अशा शब्दात त्यांनी मेट्रो प्रकल्पावरुन ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
◆मुंबई मेट्रोचे काम ठप्प होणार?
◆गेले चार महिने जपान सरकार निधीचा चौथा टप्पा देण्यास तयार असतानाही ठाकरे सरकारने फंड नाकारला
◆वाढलेला 10 हजार कोटींचा खर्च आणि कारशेडचे न्यायप्रविष्टतेचे फसवे कारण देऊन निधी नाकारलाश्रेयाचे नारळ फोडायला मात्र पुढे
आणि विकासात सदैव आडवे घोडे!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) June 16, 2021
आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केले आहेत. यामध्ये ते म्हणाले कि, ‘मेट्रो कारशेडच्या कांजूरमार्ग जागेची किंमत बाजार भावाने 3 हजार कोटी द्यायला तयार आहोत, असे आर.ए राजीव यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रात सांगितले. सरकार म्हणते आम्हाला माहिती नाही? मग एमएमआरडीएवर कुणाचा दबाव? कुठल्या मजल्यावरुन आदेश गेले? अशी बेमालूमपणे बनवाबनवी?
मेट्रो कारशेडच्या कांजूरमार्ग जागेची किंमत बाजार भावाने 3 हजार कोटी द्यायला तयार आहोत, असे आर.ए राजीव यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रात सांगितले.
सरकार म्हणते आम्हाला माहिती नाही?
मग एमएमआरडीएवर कुणाचा दबाव?
कुठल्या मजल्यावरुन आदेश गेले?
अशी बेमालूमपणे बनवाबनवी? 1/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) June 16, 2021
कारशेड कांजुरमार्गला करणे म्हणजे भविष्यातील 25 हजार कोटींच्या घोटाळ्याची पायाभरणी, खाजगी जमीन मालकांच्या फायद्यासाठीचा हा डाव, आम्ही हे वारंवार सांगत होतो. हळूहळू सत्य समोर येतेय! जमीन घोटाळ्यावरुन आम्हाला प्रश्न विचारता मग हे काय सुरु आहे? चेहरा भोळा अन् भानगडी सोळा!’ अशा आशयाचे ट्वीट करून त्यांनी टीकास्त्र डागलेले आहे.
"कारशेड कांजुरमार्गला करणे म्हणजे भविष्यातील 25 हजार कोटींच्या घोटाळ्याची पायाभरणी"…खाजगी जमीन मालकांच्या फायद्यासाठीचा हा डाव, आम्ही हे वारंवार सांगत होतो.
हळूहळू सत्य समोर येतेय!जमीन घोटाळ्यावरुन आम्हाला प्रश्न विचारता मग हे काय सुरु आहे?
चेहरा भोळा अन् भानगडी सोळा! 2/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) June 16, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- ‘औरंगाबाद शहरातील लोक जाती-धर्मावर मतदान करतात, त्यांना विकास आवडत नाही’
- ‘डिस्को डान्सर’ मिथुन चक्रवर्ती यांचे ७१व्या वर्षात पदार्पण
- मोठी बातमी : मूक आंदोलनातील लोकप्रतिनिधींच्या भाषणबाजीवर मराठा क्रांती मोर्चा नाराज !
- कोरोना नियमांवरून राष्ट्रवादीच्या कार्यक्रमातच मंत्री शिंगणेंकडून कार्यकर्त्यांना कानपिचक्या
- याहीवर्षी राज्यभरात भरणार मोबाईलमध्येच शाळा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
