Share

‘मोदी सरकारने मर्जीनेच दोन लसींच्या डोसमधील अंतर वाढवले’, राहुल गांधींचा गंभीर आरोप

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी कोरोना आणि लसीकरणावरून सातत्याने मोदी सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत. देशात करोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण सुरु आहे. या लसीकरणावरुन राहुल गांधी सतत मोदी सरकारवर निशाणा साधत असतात. १५ जूनपर्यंत देशभरात २८,००, ४५८ नागरिकांना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत २६,१९,७२,०१४ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. दुसऱ्या लाटेचा जोर ओसरलेला असताना आणि तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लसीकरणावर भर देण्याची गरज असल्याचे मत राहुल गांधी यांनी अनेकदा व्यक्त केले आहे.

दरम्यान, त्यांनी आपल्या ट्विटमध्ये एक अहवाल शेअर केला आहे. या अहवालात कोविशिल्डच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील अंतर वाढवल्याबद्दल त्यांनी सरकारवर टीका केली आहे. या अहवालात त्यांनी असा आरोप केला आहे की, सरकारने शास्त्रज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढविले आहे.

राहुल गांधी म्हणाले, “पंतप्रधान मोदींची खोटी प्रतिमा वाचविण्यासाठी केंद्र सरकार सतत व्हायरसचा आधार घेत आहे आणि जनतेचा जीव घेत आहे. देशातील लसीकरण लवकर पुर्ण करावे लागेल. मोदी सरकारच्या असक्रियतेमुळे लशीची कमतरता लपविण्यासाठी भाजपाने रोज खोटं बोलनं आणि पोकळ घोषणा देण्याने काही होणार नाही. देशाला त्वरित आणि संपूर्ण लसीकरणाची आवश्यकता आहे.”

नेमके प्रकरण काय आहे?

तज्ज्ञांच्या सल्लानं कोविशील्डच्या दोन डोसमधील कालावधी वाढवत असल्याचं सरकारनं सांगितलं होतं. मात्र, अशा प्रकारचा कोणताही सल्ला आपण केंद्राला दिला नसल्याचं पॅनलमधील तीन तज्ज्ञांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितलं आहे. कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर ६ ते ८ आठवड्यांवरून १२ ते १६ आठवडे करण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं १३ मे रोजी घेतला. त्यावेळी देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती आणि लसींचा साठा कमी होता.

काय म्हटले आहे अहवालात?

नॅशनल टेक्निकल ऍडव्हायजरी ग्रुप ऑफ इम्युनायझेशनच्या (एनटीएजीआय) शिफारशीनुसार कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेत असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. ब्रिटनमध्ये करण्यात आलेलं सर्वेक्षण आणि त्यातून उपलब्ध झालेली आकडेवारी यांच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं गेलं. मात्र अशा प्रकारची शिफारस करण्यासाठी पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याचं एनटीएजीआयच्या पॅनलमधील १४ पैकी ३ सदस्यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!