Share

‘चेहरा भोळा अन् भानगडी सोळा’ ; भाजपाची ठाकरे सरकारवर जहरी टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आरेमध्ये मेट्रो कारशेड उभारण्यास प्रचंड विरोध झाल्याने महाविकास आघाडी सरकारने कारशेड आरेतून कांजूरमार्ग स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. सध्या यावरून जोरदार राजकारण सुरू आहे. याच दरम्यान भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जहरी टीका केली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडत महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. ‘चेहरा भोळा अन् भानगडी सोळा’ असं म्हणत कांजूरमार्ग कारशेडवरून शेलार यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

मुंबई मेट्रो प्रकल्पावरुन आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबई मेट्रोचे काम ठप्प होणार? असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला आहे. गेले चार महिने जपान सरकार निधीचा चौथा टप्पा देण्यास तयार असतानाही ठाकरे सरकारने फंड नाकारला. वाढलेला 10 हजार कोटींचा खर्च आणि कारशेडचे न्यायप्रविष्टतेचे फसवे कारण देऊन निधी नाकारला. श्रेयाचे नारळ फोडायला मात्र पुढे आणि विकासात सदैव आडवे घोडे! अशा शब्दात त्यांनी मेट्रो प्रकल्पावरुन ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केले आहेत. यामध्ये ते म्हणाले कि, ‘मेट्रो कारशेडच्या कांजूरमार्ग जागेची किंमत बाजार भावाने 3 हजार कोटी द्यायला तयार आहोत, असे आर.ए राजीव यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रात सांगितले. सरकार म्हणते आम्हाला माहिती नाही? मग एमएमआरडीएवर कुणाचा दबाव? कुठल्या मजल्यावरुन आदेश गेले? अशी बेमालूमपणे बनवाबनवी?

कारशेड कांजुरमार्गला करणे म्हणजे भविष्यातील 25 हजार कोटींच्या घोटाळ्याची पायाभरणी, खाजगी जमीन मालकांच्या फायद्यासाठीचा हा डाव, आम्ही हे वारंवार सांगत होतो. हळूहळू सत्य समोर येतेय! जमीन घोटाळ्यावरुन आम्हाला प्रश्न विचारता मग हे काय सुरु आहे? चेहरा भोळा अन् भानगडी सोळा!’ अशा आशयाचे ट्वीट करून त्यांनी टीकास्त्र डागलेले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!