🕒 1 min read
बीड : ऊसतोड कामगारांच्या मुलाला शरद पवारांनी मंत्री केले. सरकारमध्ये राहून लोकांची सेवा करण्याची संधी दिली. त्यामुळे ऊसतोड मंजुरांच्या फायद्यासाठी ऊसतोड कल्याणकारी महामंडळ सुरू केले. केवळ दिवंगत गोपीनाथ मुंडेंचे नाव घेऊन मत मागायला ते सुरू केले नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे नाव न घेता लगावला.
बीड जिल्ह्यातील गेवराई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धनंजय मुंडे यांची उपस्थिती होती.
ते म्हणाले, ऊसतोड मजुरांना कामाच्या बदल्यात योग्य मोबदला मिळत नव्हता. पण एका ऊसतोड कामगाराच्या मुलाला शरद पवारांनी मंत्री केले आणि मला ऊसतोड कामगारांसाठी कल्याणकारी महामंडळ सुरू करण्याची संधी दिली. महामंडळाच्या माध्यमातून प्रतिटनामागे साखर कारखान्यांकडून १० व सरकारचे १० असे एकूण २० रुपये अनुदान महामंडळाला देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आम्ही घेतला. ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी १० निवासी शाळा सुरू करण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यातील या शाळांत गेवराई, माजलगाव, पाटोदा, अंबड, घनसांवगी, कर्जतसह काही तालुक्यांचा समावेश आहे.
महामंडळ स्थापन करून प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली आहे. फक्त दिवंगत गोपीनाथ मुंडेंचे नाव घ्यायचे, त्यांच्या नावावर मतं मागायची, असे आता होणार नाही. ऊसतोड मजुरांसाठी अनेक गोष्टी करणे बाकी आहेत. हे काम मोठे आहे, याकरिता सर्वांच्या मदतीची गरज भासणार आहे असे धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘आमचे आंदोलन मूक नसून बोलके असणार’, विनायक मेंटेंची खा.संभाजीराजेंना कोपरखळी
- ‘जनगणना न केल्याने ओबीसींचे नुकसान’, छगन भुजबळ यांचा आरोप
- भाजपला धक्का! तब्बल १५ नेत्यांचा पक्षाला रामराम, काय आहे प्रकरण जाणून घ्या..
- दिलासा! देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट, नव्या रुग्णांपेक्षा ठीक होणाऱ्यांची संख्या दुपटीहून अधिक
- ‘माझी वारी-माझी जबाबदारी यानूसार ज्ञानोबा-तुकोबा पालखी पायी वारी करणार’, विश्व वारकरी सेनेचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
