Share

बीडमध्ये मराठा आरक्षण मोर्चा; आ.मेटेंसह तीन हजार जणांवर गुन्हा दाखल

Published On: 

🕒 1 min read

बीड : मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये मराठा क्रांती संघर्ष मोर्चाकडून आंदोलन करण्यात आले. या प्रकरणी आयोजकांसह 3 हजार लोकांवर गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. यात आमदार विनायक मेटे, नरेंद्र पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी विनायक मेटे यांनी ठाकरे सरकार आणि मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली.

बीडमधील श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल याठिकाणी मराठा समाजाने एकत्र येत मोर्चा काढला होता. हा मोर्चा शहरातील प्रमुख रत्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकला होता. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला यानंतर मान्यवरांची आक्रमक भाषणे झाली. विशेष म्हणजे, या मोर्चाला प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली नव्हती. मोर्चाची परवानगी नाकारली तरी, कसल्याही परिस्थिती मोर्चा निघणारचं असं मेटे यांनी जाहीर केलं होतं.

अखेर, विना परवानगी मोर्चा काढल्याप्रकरणी प्रमुख 21 जणांसह तीन हजार जणांवर गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. यामध्ये विनायक मेटे यांचा सुद्धा सहभाग आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथरोग नियंत्रण कायद्या नुसार सुद्धा ही कारवाई करण्यात आली. मंडळ अधिकारी अतुल झेंड यांच्या फिर्यादीवरून बीड शहर पोलिसात आमदार विनायक मेटे, नरेंद्र पाटील, राजेंद्र घाग, रमेश पोकळे, स्वप्निल गलधर, अनिल घुमरे, युवराज मस्के, मनोज जरांगे यांच्यासह २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!