🕒 1 min read
औरंंगाबाद : भारत पेट्रोलियम कार्पोरेशन कंपनीच्या गॅस एजन्सीचा परवाना आणि डिलरशीप देण्याचे आमिष दाखवून परप्रांतीय भामट्याने उद्योजकाला ५६ लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार सप्टेंबर २०२० मध्ये उघडकीस आला होता. याप्रकरणी सायबर पोलिसांनी नितीशकुमार जितेंद्रप्रसाद (वय २४, रा. हाथियारी, बिरनवॉ, पकारीबरवा, जिल्हा नवादा, बिहार) या भामट्याला गजाआड केले असून न्यायालयाने त्यास सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
एमआयडीसी वाळूज परिसरात चांगदेव सोमीनाथ तांदळे (वय ४९, रा. सिडको वाळुज महानगर-१) यांची रविकिरण इंटरप्राईजेस नावाची कंपनी आहे. शहरातील एका नामांकित दैनिकात १ ऑगस्ट २०१९ रोजी भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमीटेड कंपनीच्या गॅस एजन्सीची जाहिरात प्रकाशीत झाली होती. हि जाहिरात पाहुन चांगदेव तांदळे यांनी त्यांचे प्रतिनिधी गणेश मालपाणी यांच्या मार्पâत २९ ऑगस्ट २०१९ रोजी गॅस एजन्सीसाठभ् अर्ज केला होता. त्यानंतर २१ जानेवारी २०२० रोजी त्यांची मुलाखत झाल्यावर कंपनीने निकाल देत एमआयडीसी वाळूज परिसरातील पंढरपुरसाठी त्यांची दुस-या क्रमांकावर निवड झाल्याचे सांगितले.
५ मे रोजी संदीप पांडे नावाच्या व्यक्तीने चांगदेव तांदळे यांच्या मोबाईल्वर संपर्क साधुन गॅस एजन्सीच्या डिलरशीपची ऑफर देऊन त्यासाठी ५६ लाख ६६ हजार रुपये खर्च येईल असे सांगितले. त्यापैकी परवान्यासाठी ३५ लाख ६६ हजार, सिलेंडर घेण्यासाठी २१ लाख, तसेच सिलेंडरच्या गोदामासाठी १८ लाख रुपये कंपनीकडून मिळतील असेही सांगितले. सोबतच गोदाम भाड्यापोटी महिन्याला ३५ हजार व कर्मचा-यांचे वेतन म्हणून १५ हजार रुपये असे दरमहा ५० हजार रुपये देण्यात येईल असेही पांडे याने सांगितले होते. त्यानुसार चांगदेव तांदळे यांनी संदीप पांडे याच्या बँक खात्यांवर टप्प्याटप्प्याने ५६ लाख ६१ हजार सातशे रुपये पाठवले होते.
दरम्यान फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर चांगदेव तांदळे यांच्या तक्रारीवरून सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता, उपायुक्त मिना मकवाना, सहायक आयुक्त डॉ. रविंद्र साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक गिता बागवडे, उपनिरीक्षक राहुल चव्हाण, जमादार संजय साबळे, विवेक औटी, गोकुळ कुतरवाडे, मन्सुर शहा, विजय घुगे, अमोल सोनटक्के, कृष्णा सावध, छाया लांडगे आदींच्या पथकाने तांत्रिक तपास करून नितीशकुमार जितेंद्रप्रसाद याला बेड्या ठोकल्या.
महत्त्वाच्या बातम्या
- शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त संभाजीराजेंचं नवं ट्वीट; म्हणाले, यंदाचा सोहळा…
- अभिनेत्री यामी गौतमने चाहत्यांना दिला सुखद धक्का, दिग्दर्शकासोबत बांधली लग्नगाठ
- डब्लुटीसी फायनल संदर्भात ‘ब्रेट ली’ची सावध प्रतिक्रीया, म्हणाला…
- पंजाबमध्ये अमरिंदर सिंह विरुद्ध सिद्धू वाद चिघळला; निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये घमासान
- ‘राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या भोसले समितीत मराठाद्वेषी सदस्य’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
