मुंबई : २०१८ मध्ये दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर बॉल टेम्परिंग प्रकरणानंतर क्रिकेट जगतात मोठी खळबळ उडाली होती. यानंतर ऑस्ट्रेलिया संघातील दोन खेळाडूंना एका वर्षाच्या बंदीला सामोरे जावे लागले. मात्र हे प्रकरण पुन्हा नव्याने चर्चेत आले आहे.
आता या प्रकरणात ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे सहाय्यक प्रशिक्षक राहिलेले डेव्हिड साकेर यांनी एक नविन मागणी केली आहे. बॉल टेम्परिंग प्रकरणावर जो अहवाल ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने सादर केला होता, तो सार्वजनीक करण्यात यावा. ‘बॉल टेम्परिंग प्रकरणात अजुनही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने बॉल टेम्परिंग प्रकरणाचा अहवाल सार्वजनिक करावा. तसेही अहवाल जाहीर करायला क्रिकेट ऑस्ट्रेलियाला अडचण असेल असे मला वाटत नाही. मात्र अंतिम निर्णय हा ऑस्ट्रेलियन समितीवर अवलंबून असेल. परंतु जर अहवाल जाहीर केला तर लोक प्रश्न उपस्थित करणार नाही असे मला वाटते.’ असे डेव्हिड साकेर हे म्हणाले आहे.
डेव्हिड साकेर हे २०१८ साली दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या त्या कसोटीत सहाय्यक प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्या सामन्यात बॉल टेम्परिंगच्या प्रकरणात कॅमेरून बॅनक्रॉफ्टने बॉल टेम्परिंगची माहिती ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना आधीच होती, असे सांगितले. या घटनेनंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बॅनक्रॉफ्टवर नऊ महिन्यांसाठी बंदी घातली होती, तर तत्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर १२ महिन्यांसाठी बंदी घातली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- जागतिक पर्यावरण दिन! जिल्हाधिकाऱ्यांनी लावले सपत्नीक वडाचे झाड
- शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त संभाजीराजेंचं नवं ट्वीट; म्हणाले, यंदाचा सोहळा…
- अभिनेत्री यामी गौतमने चाहत्यांना दिला सुखद धक्का, दिग्दर्शकासोबत बांधली लग्नगाठ
- डब्लुटीसी फायनल संदर्भात ‘ब्रेट ली’ची सावध प्रतिक्रीया, म्हणाला…
- पंजाबमध्ये अमरिंदर सिंह विरुद्ध सिद्धू वाद चिघळला; निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये घमासान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
