Share

प्रकाश जावडेकरांचा कॉंग्रेसवर हल्लाबोल; म्हणाले,राहुल गांधी यांनी इतरांना सल्ले देण्याऐवजी …

Published On: 

नवी दिल्ली – कोरोनाच्या महामारीतून बाहेर पडण्यासाठी लासिकरणावर भर दिला जात आहे. लसींचा व्यवस्थित पुरवठा होत नसल्याने अनेक ठिकाणी लसीकरण बंद पडत असले तरीही लस उपलब्ध होताच पुन्हा लसीकरण सुरु होत आहे. देशात करोना लशींचा तुटवडा असला तरी भारतातील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याचे प्रयत्न केंद्र सरकार करत आहे.

एका बाजूला हे सर्व होत असताना दुसऱ्या बाजूला एक खळबळजनक बातमी समोर आली आहे.पंजाबमध्ये सरकारने खाजगी रुग्णालयांना लसी विकल्याचा आरोप अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांनी केला आहे. प्रत्येक डोस मागे पंजाब सरकारला जवळपास ६०० रुपयांचे कमिशन मिळत असल्याचा देखील आरोप बादल यांनी केला आहे.

हा सर्व गंभीर प्रकार समोर आल्यानंतर कॉंग्रेसवर टीका होऊ लागली आहे. यानंतर आता कॉंग्रेस सरकार ताळ्यावर आले असून विकलेल्या लसी आता पुन्हा माघारी मागवण्यात आल्या आहेत.

दरम्यान, या सर्व प्रकाराची आता केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली असून एक पत्र पाठवून यासंदर्भात विचारणा केली आहे. या वृत्तामुळे राष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली असून भाजपला देखील आता कॉंग्रेसवर टीका करण्याची संधी चालून आली आहे.

कोरोना प्रतिबंधक उपाय योजना आणि लसीकरण मोहीम राबवताना पंजाब सरकारनं गैर व्यवहार केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज केला. कॉंग्रेस पक्षामध्ये सुरू असलेल्या अंतर्गत राजकारणाचा फटका पंजाबच्या जनतेला बसत आहे, असं सांगून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी इतरांना सल्ले देण्याऐवजी या गैर प्रकारांना आळा कसा घालता येईल याकडे लक्ष द्यावं असं जावडेकर म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!