Share

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसोबत विमा कंपन्यांचा अन्याय, सखोल चौकशीची भाजपची मागणी

Published On: 

🕒 1 min read

वैजापूर : गेल्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. असे असतांना विमा कंपनीने केवळ कपाशी, मुग व कांदा या पिकांसाठी विमा संरक्षण देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. तसेच मंजुर विमा रक्कमही अतिशय तोकडी आहे. याप्रकरणी चौकशी करुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी भाजपाच्या वैजापूर तालुका शाखेने उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांना केली आहे.

२०२०-२१ च्या खरीप हंगामात तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने कांदा, मुग, कपाशी या पिकांसोबतच मका, तुर, सोयाबीन या खरीप पिकांचेही नुकसान झाले. मात्र शेतकऱ्यांना विमा कंपनीने केवळ कांदा, मुग व कपाशी या तीन पिकांसाठीच विमा मंजुर केला आहे. भाजपाचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील दांगोडे, उद्योग आघाडीचे कैलास पवार, बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर जगताप यांनी शेतकऱ्यांच्या वतिने उपविभागिय अधिकारी माणिक आहेर यांची भेट घेऊन निवेदन दिले.

याशिवाय तालुक्यातील महालगाव व वांजरगाव मंडलात अतिवृष्टी झाल्याचा अहवाल असतांना शेतकऱ्यांना कमी पिक विमा मंजुर झाला आहे. काही मंडळात नुकसान होऊनही भरलेल्या रकमेइतकी रक्कम मंजुर नाही असे निवेदनात म्हटले आहे. अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी कर्ज काढून लागवड केली होती. मात्र अतिवृष्टीमुळे अनेकांचे उभे शेत वाया गेले. विमा कंपन्यांनी देखील काही पिकांसाठी नकार दिल्याने आता आम्ही काय करावे? कुणा पुढे हात पसरावे असा सवाल शेतकरी वर्गाने उपस्थित केला आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी भाजपने केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!