🕒 1 min read
सिंधुदुर्ग : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यासह देशभरात हाहाकार माजवला आहे. मार्च पासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत गेल्याने आरोग्य सेवेवर प्रचंड ताण निर्माण झाला होता. यामुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आलेख हा उतरता असल्याचं दिसून येत आहे.
पहिल्या लाटेच्या तुलनेत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अधिक रुग्ण नोंदवले जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ जून पर्यंत निर्बंध वाढवण्याचा निर्णय घेतला असला तरी ज्या शहरांमध्ये (१० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या महापालिका) आणि जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट हा १० टक्क्यांच्या खाली असेल त्यांना अधिक शिथिलता देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
त्यामुळे आता ज्या जिल्ह्यांमध्ये वा शहरांमध्ये पॉझिटिव्हिटी रेटनुसार आढावा घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सूचना लागू केल्या जात आहेत. नाशिक जिल्ह्यासह मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे अशा शहरांमध्ये काहीशी शिथिलता देण्यात आली असतानाच दुसरीकडं सिंधुदुर्गात मात्र कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे.
वाढती कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता जिल्हाबंदी करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या खारेपाटण, करूळ, आंबोली, बांदा सीमा अत्यावश्यक सेवा वगळता परजिल्ह्यातील किंवा परराज्यातील व्यक्तींना वाहतुकीसाठी परवानगी नसेल. १ जून ते १५ जून पर्यंत ही जिल्हा बंदी लागू करण्यात आली आहे. या काळात जिल्याच्या सर्व सीमा बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. दरम्यान, अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तू, वैद्यकीय कारणासाठी किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू तसेच कोविड १९ निगडित व्यक्तींना जिल्हाबंदीतुन सूट असेल.
महत्त्वाच्या बातम्या
- दोन कोटी दोन लाख रुपये खर्च करुन औरंगाबाद मनपा करणार ७ हजार पलंगाची खरेदी
- Breaking : पदोन्नती आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक…
- डब्लुटीसीच्या फायनलमध्ये ‘या’ कारणामुळे न्युझीलंड भारतीय संघाला भारी पडु शकतो: दिलीप वेगंसकर
- पापणी लवण्याआधी धोनीप्रमाणे क्षणात त्याने केले यष्टीचित; व्हिडीओ व्हायरल
- काल पवारांची भेट, आज खडसेंच्या घरी; सत्तांतराबाबत फडणवीसांच मोठं विधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
