🕒 1 min read
मुंबई : यष्टिरक्षण म्हणले की सर्वांना आठवतो तो भारतीय क्रिकेटचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी. धोनीने यष्टिरक्षण करताना स्वत:ची एक वेगळीच शैली स्थापन केली होती. अनेकदा धोनीने पापणी लवण्याच्या आधी फलंदाजाची दांडी गुल केल्याचे अनेक किस्से आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बघायला मिळाले आहेत.
अशीच एक घटना काउंटी क्रिकेटमध्ये घडली आहे. इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या काउंटी क्रिकेटमध्ये वॉर्विकशायर विरुद्ध नॉटिंघमशायर या दोन संघादरम्यान झालेल्या सामन्यात वॉर्विकशायर संघाचा यष्टीरक्षक मायकेल बर्गेसने अप्रतिम यष्टीरक्षणाचा दर्जा दाखवला. या सामन्यातील दुसऱ्या डावात जो क्लार्क हा फलंदाज स्ट्राइकला होता. यावेळी गोलंदाज ओजे हेनन याने टाकलेला चेंडु लेग साइडने सरळ यष्टीरक्षकाच्या हातात विसावला. मात्र यादरम्यान फलंदाज क्लार्क हा क्रिझच्या पुढे आला. या संधीचा फायदा उचलताना मायकेलने क्षणात त्याला यष्टीचीत केले.
Serious glove work from Michael Burgess ????#LVCountyChamp @WarwickshireCCC pic.twitter.com/Mf0V2zMVYz
— Rothesay County Championship (@CountyChamp) May 31, 2021
मायकेलचे यष्टीरक्षक बघुन महेंद्रसिंह धोनीची आठवण चाहत्यांना झाली. या सामन्यात वॉर्विकशायरच्या संघाने नॉटिंघमशायरवर १७० धावांनी विजय मिळवला. वॉर्विकशायरने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ३४१ केल्या होत्या. तर प्रत्युत्तरात नॉटिंघमशायरने आपल्या पहिल्या डावात २९७ धावा बनविल्या. यानंतर सामन्यातील तिसऱ्या डावात वॉर्विकशायर २६४ भावा उभारल्या होत्या. ३०८ धावांचा पाठलाग करताना नॉटिंघमशायरचा संघर दुसऱ्या डावात केवळ १३८ धावा करु शकला.
महत्वाच्या बातम्या
- म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शनचा तुटवडा ; मागणी २० हजारांची केंद्राकडून केवळ ५ हजारांचा पुरवठा
- ‘इंडियन आयडल १२’ मध्ये पुन्हा येण्यास विशाल ददलानीने ‘या’ कारणामुळे दिला नकार
- डब्लुटीसीच्या फायनलसाठी कोहलीच्या प्रशिक्षकांची ‘या’ संघाला पसंती
- पुन्हा अशीच गर्दी होत राहिल्यास निर्बंध अधिक कठोर केले जातील; मुख्यमंत्र्यांचा इशारा
- अभिनेता जॅकी भगनानी याच्यासह इतर आठ जणांनी लैंगिक छळ केल्याचा मॉडेलने केला आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
