मुंबई : आयपीएल स्थगीतीनंतर काही दिवसातच बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. या दौऱ्यात भारतीय संघाला जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्याची मालिका खेळायची आहे.
इंग्लंडमध्ये भारतीय संघाला न्युझीलंड विरुद्ध जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. या सामन्यावर भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसकर यांनी मत मांडताना न्युझीलंडचा संघ वरचढ ठरेल असे सांगीतले आहे. कारण भारताविरुद्धच्या सामन्याआधी न्युझीलंडचा संघ इंग्लंडसोबत दोन कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे. यानंतर ते भारताविरुद्ध डब्लूटीसी स्पर्धेचा अंतिम सामना खेळतील. यामुळे त्यांच्यासाठी इंग्लंडमध्ये सामना खेळण्याचा पुरेसा अनुभव असणार आहे. मात्र भारतीय संघाला सरळ न्युझीलंड विरुद्ध डब्लुटीसी स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले. डब्लुटीसी स्पर्धेचा अंतिम सामना हा भारतासाठी इंग्लंड दौऱ्यातील पहिला सामना असणार आहे. तर न्युझीलंड संघासाठी तिसरा सामना असणार आहे. त्यामुळे न्युझीलंडच्या संघाला तेथील वातावरणाचा पुरेसा अनुभव आलेला असल्याने तो संघ भारताला वरचढ ठरु शकतो. भारतीय संघ इंग्लंडमध्ये १८ ते २२ जुन दरम्यान जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. यानंतर इंग्लंडसंघासोबत ५ कसोटी सामन्याची मालिका खेळायची आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- खासगी अतिक्रमण प्रकरणांमध्ये पैसे भरल्यानंतरच होणार कारवाई! मनपाने मंजूर केला नवीन ठराव
- केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची तब्येत बिघडली, बारावीच्या परीक्षेचा चेंडू आता मोदींच्या दालनात ?
- काल पवारांची भेट, आज फडणवीसांनी गाठलं मुक्ताईनगर; चंद्रकांत पाटील म्हणाले…
- ‘ठाकरे आणि पवारांनी केंद्र सरकारकडे केलेल्या मागण्यांचा पाठपुरावा करुन मी त्या पूर्ण करुन घेईन’
- म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शनचा तुटवडा ; मागणी २० हजारांची केंद्राकडून केवळ ५ हजारांचा पुरवठा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
