Share

‘तुटवडा असताना खासगी रुग्णालयांना लस कशी मिळते?’, ‘आप’चा केंद्राला सवाल

Published On: 

नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनी केंद्र सरकारवर कोरोना लसीचे चुकीचे व्यवस्थापन केल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर एकीकडे राज्यांना लसींचा तुटवडा असल्याचे सांगितले जाते. मग खासगी रुग्णालयांना लस कशी काय उपलब्ध होतेय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

सिसोदिया म्हणाले, दिल्लीत १८ ते ४५ वर्षांच्या नागरिकांसाठी लसीचे ५.५ लाख डोस मिळणार आहेत. परंतु हे डोस १० जूनपूर्वी मिळण्याची शक्यता दिसत नाही. दिल्लीत या वयोगटातील ९२ लाख लोकांना डोस देण्यासाठी १.८४ कोटी डोसची गरज भासणार आहे. केंद्राने एप्रिलमध्ये ४.५ व मे मध्ये ३.६७ लाख डोस उपलब्ध करून दिले. ते म्हणाले, केंद्र लसींच्या वितरणाच्या बाबतीत अडथळा आणणारी भूमिका मांडू लागले आहे.

आयआयटी दिल्लीने उच्च न्यायालयात एक अहवाल सादर केला आहे. त्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल इशारा देण्यात आला आहे. तिसऱ्या लाटेत राष्ट्रीय राजधानीत ४५ हजार नवे रुग्ण आढळून येऊ शकतात. त्यापैकी नऊ हजार लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येऊ शकते. त्यासाठी योग्य ती व्यवस्था करावी लागेल. तसे झाल्यास एवढ्या रुग्णसंख्येसाठी दररोज ९४४ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासेल.

दरम्यान, केंद्राने राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांना देखील लसींचे २२.७७ कोटींहून अधिक डोस उपलब्ध करून दिलेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी यासंबंधीची माहिती दिली. मंत्रालयानुसार राज्यांना मोफत व त्यांच्या गरजेनुसार २२, ७७, ६२, ४५० डोस दिले आहेत. चार लाखांहून जास्त (४,८६,१८० ) डोस लवकरच पोहोचतील.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!