मुंबई : आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर बीसीसीआयने भारतीय संघाची इंग्लंड दौऱ्यासाठी घोषणा केली. या दौऱ्यात पहिले भारतीय संघ जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळेल. १८ ते २२ जुनदरम्यान साउथहॅप्मटन येथे भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान ही लढत होईल. यानंतर ऑगस्ट महिन्यात इंग्लंड संघासोबत ५ कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे. मुंबईमध्ये दहा दिवसांचा कॉरंटाईन कालावधी पूर्ण करून भारतीय संघ २ जूनला इंग्लंडला रवाना होणार आहे.
भारतीय संघातले सगळे खेळाडू कोरोनाच्या नियम आणि अटींना अधिन राहून मुंबईत क्वारंटाईन आहे. याचदरम्यान खेळाडू सोशल मीडियावर बरेच सक्रिय दिसत आहेत. कर्णधार विराट कोहली देखील सोशल मीडियावर सक्रिय दिसत आहे. दरम्यान, एका चाहत्याने इन्स्टाग्रामवरुन तुझं आणि महेंद्रसिंग धोनीचं नातं दोन शब्दात सांग, असा प्रश्न विराट केला होता. त्यावर विराटने त्याला हृदय जिंकणारं उत्तर दिलं
एका फॅन्सने विराटला कोड्यात टाकणारा प्रश्न विचारला. तुझं आणि माहीचं नातं केवळ दोन शब्दात सांग, या प्रश्नावर विराट म्हणाला ‘माझं आणि माहीचं नातं म्हणजे विश्वास आणि आदर…’ असं मन जिंकणारं उत्तर विराटने दिलं. विराटच्या या उत्तराची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- पती वर काहीही आरोप करणाऱ्या नेटकऱ्यांना इरफानच्या बायकोचं रोखठोक प्रत्युत्तर, म्हणाली…
- ‘या’ कारणामुळे दिल्लीच्या कर्णधारपदावरून हटवले जाऊ शकते पंतला
- डब्लुटीसी अंतिम सामन्यापुर्वी न्युझीलंडच्या संघात ‘या’ नविन सलामीवीराची एन्ट्री
- ऑस्ट्रेलिया संघाला धोनी सारख्या फिनिशरची गरज : रिकी पॉन्टिंग
- मराठी अभिनेता भूषण कडुवर कोसळला दु:खाचा डोंगर; कोरोनामुळे पत्नीचा मृ्त्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
