मुंबई : सोशल मीडियावर सध्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणची जोरदार चर्चा चालू आहे. चर्चेच कारण म्हणजे त्याची पत्नी. इरफानची पत्नी सफा बेग ही फारच सुंदर आहे. सोशल मीडियावर नेहमीच तिच्या सुंदरतेची चर्चा होत असते. नुकतंच इरफानने पत्नी आणि मुलासोबत एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्या फोटोची सर्वत्र चर्चाही झाली मात्र, त्या फोटोमुळे नेटकऱ्यांनी इरफानला फार ट्रोल देखील केले.
त्याने पोस्ट केलेल्या फोटोत पत्नी सफा बेग हिचा चेहरा ब्लर केला होता. असा फोटो सोशल मीडियावर फोटो पोस्ट केल्याने त्याच्यावर टीका होत आहे. त्याने आपल्या पत्नीच्या फोटो ब्लर केल्याने नेटकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले आहे. मात्र त्या नंतर इरफानने देखील नेटकऱ्यांना चांगलेच प्रतिउत्तर दिले.
आता इरफानची बायको सफाने देखील नवऱ्यावर बेछूट आरोप करणाऱ्या नेटकऱ्यांना रोखठोक प्रतिउत्तर दिले आहे. “मी माझा मुलगा इमरान याचं इंस्टाग्राम अकाउंट तयार केलं आहे. जेव्हा तो मोठा होईल तेव्हा तो हे सगळे फोटो पाहिल आणि त्याच्या बालपणीच्या आठवणीत रमेल. याच कारणासाठी मी त्याचं सोशल मीडिया अकाउंट तयार केलंय. हे सोशल मीडिया अकाउंट मीच सांभाळते. त्याच्यावर फोटो पोस्ट करत असते. माझे चेहरा छापलेले फोटो मीच पोस्ट केले आहेl. याचा सर्वस्वी निर्णय माझा होता. इरफानचा यात काहीही संबंध नव्हता”, असं सफा म्हणाली आहे.
इरफान पठाण आपली पत्नी सफा बेगसोबतचे फोटो पोस्ट करतो त्यामध्ये सफाचा चेहरा कायम झाकलेला दिसतो. सफा बेग हिच्या चेहर्यावर नेहमी बुरखा असतो किंवा ती स्वत: चा चेहरा हाताने लपवते. मात्र आता या फोटोमुळे इरफानला ट्रोलर्सचा सामना करावा लागला.
महत्वाच्या बातम्या
- ‘रस्त्यावर केलेली ही घाण कोण उचलतं?’ ; पाळीव प्राणी फिरवणाऱ्या सेलिब्रिटींना अभिनेत्याचा सवाल
- आयपीएलचे उर्वरित सामने होणारच ; गांगुली यांनी अशी केली ICC ची कोंडी
- निवृत्तीनंतर हाशिम आमला पाडतोय काउंटी क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस
- आयपीएल २०२१ च्या उर्वरित सामन्याची घोषणा होताच राजस्थानने शेअर केला भन्नाट व्हिडीओ
- चोरट्यांनी पाच दुचाकी लांबवल्या


