Share

डब्लुटीसी अंतिम सामन्यापुर्वी न्युझीलंडच्या संघात ‘या’ नविन सलामीवीराची एन्ट्री

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल स्पर्धेनंतर क्रिकेट रसिकांचे लक्ष हे जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याकडे लागले आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ २ जुन रोजी इंग्लंडला रवाना होणार आहे. याआधी भारतीय संघ मुंबई येथे विलगीकरणात आहे. तर न्युझीलंडचा संघ हा इंग्लंडमध्ये सराव करत आहे.

यादरम्यान इंग्लंडमधून एक नवीन माहिती समोर आली आहे. भारताविरुद्धच्या सामन्याआधी न्युझीलंडच्या संघाला इंग्लंडविरुद्ध २ कसोटी सामन्याची मालिका खेळायची आहे. या मालिकेत न्युझीलंडकडून डेवॉन कॉनवे हा खेळाडू सलामीवीराची भूमिका पार पाडणार आहे. हाच सलामीवीर भारताविरुद्धच्या सामन्यात सुध्दा खेळणार असल्याची माहिती समोर येत आहे. कॉनवेने मागील वर्षी टी-२० मध्ये पदार्पण केले होते. यानंतर अवघ्या ८ महिन्यात तो कसोटी पदार्पण करत आहे.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेआधी न्युझीलंडचा संघ आपापसात सराव सामना खेळत आहे. या सरावात टॉम लॅथम इलेव्हन आणि केन विलियम्सन इलेव्हन या दोन्ही संघात सामना खेळला जात आहे. या सामन्यात कॉनवे हा लॅथम इलेव्हन संघासाठी खेळतोय. या सामन्यात कॉनवेने पहिल्या दिवशी फलंदाजी करताना ५५ धावा केल्या आणि त्यानंतर निवृत्त झाला. यावेळी कॉनवेने कर्णधार लॅथमसह १०६ धावांची सलामी भागीदारी केली. त्याच्या या खेळीचे कर्णधार विल्यमसनने कौतुक केले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!