🕒 1 min read
मुंबई : आयपीएल १४ च्या मोसमात दिल्ली कॅपिटल्स संघाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. दिल्ली कॅपिटल्सचा दिग्गज खेळाडू आणि कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या ऐवजी रिषभ पंतवर संघाच्या कर्णधापदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
मात्र, राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर केले. कोरोनाच्या या काळात भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. मात्र स्पर्धेत कोरनाचा शिरकाव झाला आणि बीसीसीआयने उर्वरित स्पर्धा स्थगित केली.
यानंतर आता आयपीएलचे उर्वरित सामने सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये युएई या ठिकाणी खेळवण्यात येणार आहे. सध्याच्या गुणतालिकेत अव्व्ल स्थानी असलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघात मोठा बदल होण्याची शक्यता आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्लीला पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर नेणाऱ्या ऋषभ पंतला कर्णधारपदावरून हटवले जाऊ शकते. जर श्रेयस अय्यर हा युएईमध्ये आयपीएल खेळण्यासाठी फिट झाला, तर तो दिल्लीचा कर्णधार असणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘रस्त्यावर केलेली ही घाण कोण उचलतं?’ ; पाळीव प्राणी फिरवणाऱ्या सेलिब्रिटींना अभिनेत्याचा सवाल
- आयपीएलचे उर्वरित सामने होणारच ; गांगुली यांनी अशी केली ICC ची कोंडी
- निवृत्तीनंतर हाशिम आमला पाडतोय काउंटी क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस
- आयपीएल २०२१ च्या उर्वरित सामन्याची घोषणा होताच राजस्थानने शेअर केला भन्नाट व्हिडीओ
- चोरट्यांनी पाच दुचाकी लांबवल्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
