🕒 1 min read
मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या संसर्गामुळे अनेक मान्यवरांना या विषाणुची लागण झाली. यादरम्यान मराठी विनोदी अभिनेता भूषण कडू आणि त्याच्या पत्निला कोरोनाची लागण झाली होती. उपचारादरम्यान भूषण कडुची पत्नी कांदबरीची प्राणज्योत मालवली आहे.
काही दिवसापुर्वी भूषण कडू आणि त्याची पत्नी दोघांना कोरोनाची लागण झाली होती. बोरीवली येथील एका रुग्णालयात दोंघावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान कादंबरीची प्रकृती खालावली आणि २९ मे रोजी कांदबरीची प्राणज्योत मालवली. कोरोनाची लागण झाल्यानंतर भूषण कडूने आर्थिक मदतीची मागणी केली होती. मात्र मदत मिळण्यापुर्वीच कांदबरीने भूषण सोबतचा डाव अर्ध्यातच मोडला आणि त्याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.
भूषण कडू आणि कादंबरी यांना प्रकिर्त नावाचा एक लहान मुलगा आहे. कादंबरीने भूषणच्या अनेक नाटकात बॅक स्टेज सांभाळाण्याचे काम केले आहे. एका नाटकादरम्यान भूषण आणि कांदबरी यांची भेट झाली होती. पुढे दोघे प्रेमात पडले आणि लग्न केले. कोरनाच्या या संसर्गामुळे चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांना काम नसल्याने आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘रस्त्यावर केलेली ही घाण कोण उचलतं?’ ; पाळीव प्राणी फिरवणाऱ्या सेलिब्रिटींना अभिनेत्याचा सवाल
- आयपीएलचे उर्वरित सामने होणारच ; गांगुली यांनी अशी केली ICC ची कोंडी
- निवृत्तीनंतर हाशिम आमला पाडतोय काउंटी क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस
- आयपीएल २०२१ च्या उर्वरित सामन्याची घोषणा होताच राजस्थानने शेअर केला भन्नाट व्हिडीओ
- चोरट्यांनी पाच दुचाकी लांबवल्या

