मुंबई : ऑस्ट्रेलिया कडे एका पेक्षा एक अनुभवी खेळाडू आहेत. त्यामुळे येत्या टी-२० वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियन संघ चांगली कामगिरी करू शकेल. मात्र, त्यांना भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सारख्या फिनिशरची कमतरता जाणवत असल्याचे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने व्यक्त केले.
अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्यासाठी सक्षम असलेला यष्टीरक्षक ऑस्ट्रेलियाला सापडल्यास त्यांची समस्या दूर होऊ शकेल, असे पॉन्टिंगला वाटते आहे. ऑस्ट्रेलियाने ग्लेन मॅक्सवेल, मिचेल मार्श आणि मार्कस स्टोईनिस यांसारख्या खेळाडूंना फिनिशर म्हणून याआधी खेळवले आहे. मात्र हे खेळाडू देखील सात्यत्याने खराब कामगिरी करताना दिसत आहे. त्यामुळे ऑस्ट्रलिया संघाची चिंता वाढली आहे.
मागील काही काळापासून ऑस्ट्रेलियाला चांगल्या फिनिशरची कमतरता जाणवत आहे. अखेरच्या तीन-चार षटकांत ५० धावा करून संघाला सामने जिंकवून देणे हे एक कौशल्य आहे. हे कौशल्य प्रत्येक खेळाडूमध्ये नसते. त्यामुळे सर्वच संघ चांगल्या फिनिशरच्या शोधात असतात. धोनी त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत फिनिशर म्हणूनच खेळला. तो त्याचे काम फार उत्कृष्टरित्या करायचा, असे पॉन्टिंगने सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- ‘रस्त्यावर केलेली ही घाण कोण उचलतं?’ ; पाळीव प्राणी फिरवणाऱ्या सेलिब्रिटींना अभिनेत्याचा सवाल
- आयपीएलचे उर्वरित सामने होणारच ; गांगुली यांनी अशी केली ICC ची कोंडी
- निवृत्तीनंतर हाशिम आमला पाडतोय काउंटी क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस
- आयपीएल २०२१ च्या उर्वरित सामन्याची घोषणा होताच राजस्थानने शेअर केला भन्नाट व्हिडीओ
- चोरट्यांनी पाच दुचाकी लांबवल्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

