🕒 1 min read
मुंबई : बीड जिल्ह्यातील राजकारण नावाच्या झाडाचे एक पानही मुंडेंशिवाय हालत नाहीत. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे या दोघांचेही बीडवर वर्चस्व आहे. दोघा बहिणभावामधील वाद तर सर्वश्रूत आहे. मात्र, सख्खे चुलत बहिण-भाऊ यांच्यातील वादाचे नेमके कारण काय याबाबत अनेक चर्चा सुरू असतात. दोघांनीही वेळोवेळी यावर अनेकदा दावे-प्रतिदावे केलेत. पण खरे-खोटे काय यावर मतभिन्नता कायम आहे.
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे यांचा राजकीय प्रवास खऱ्या अर्थाने २००९ साली सुरू झाला. गोपीनाथ मुंडे लोकसभेवर निवडून गेल्यावर त्यांच्यानंतर धनंजय मुंडेंना परळी विधानसभेचे तिकिट देण्यात येणार हे जवळपास ठरले होते. पण गोपीनाथ मुंडेंनी जादूची कांडी फिरवत ऐनवेळी पंकजा यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज होऊन धनंजय यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पण काका-पुतण्यांच्या राजकारणात पंकजा यांची एन्ट्री कशी झाली याबाबत खुद्द पंकजा यांनी आता खुलासा केला आहे. लोकसत्ता या ऑनलाईन वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत पंकजा यांनी राजकीय प्रवेशावर भाष्य केलेय.
‘धनंजय मुंडेंचं काम पसंत नव्हतं, म्हणून मी राजकारणात आले. मी राजकारणात येणार नव्हते. तेव्हाच्या परिस्थितीत इतकं बोललं जात होतं की धनंजय निवडून येणार नाही, पंकजा मुंडेंना उभं करा. नाहीतर तेव्हा मी राजकारणात येण्यासाठी अजिबात इच्छुक नव्हते’ असा खळबळजनक खुलासा पंकजा यांनी केलाय.
त्यावेळी धनंजय भाजपमध्ये होते. पण आता मंत्री असलेल्या धनंजय यांच्याबाबत त्या म्हणाल्या की, ‘धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांचा लोकांना त्रास आहे. त्यांच्यावर ते नियंत्रण ठेवत नाहीत ही लोकांमधली चर्चा आहे. मी बीड जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून काम केलं. पण धनंजय मुंडे परळीपुरतं मर्यादित राहिले.
मी राज्याची मंत्री म्हणून काम करताना परळीच्या एखाद्या कामाकडे दुर्लक्ष झालं असावं पण धनंजय मुंडेंचं जिल्ह्यामध्ये वास्तव्य करताना इतर ठिकाणी फारसा वावर दिसत नाही. जिल्ह्याचे विषय हाताळताना ते दिसत नाहीत. वाळू माफिया, सिविल सर्जन हे विषय हाताळताना ते दिसत नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांचा सुळसुळाट आहे. त्यावर लोकांची नाराजी आहे. ज्या गुंड प्रवृत्ती आम्ही दाबून टाकल्या होत्या त्या आता पुन्हा बाहेर आल्यात’, असे पंकजा यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महाविकास आघाडीतील अर्ध्या मंत्र्यांचा मराठा आरक्षणाला विरोध’
- ‘मोदीजी, ख्वाब-ए-गफलतीतून बाहेर पडा’, ओवैसींचा हल्लाबोल
- ‘चंद्रकात पाटील ‘त्या’वेळी जागे होते की झोपेत?’, अजितदादांनी घेतली फिरकी
- महाविकास आघाडी सरकार अडचणीत! मुख्यमंत्री ठाकरेंविरोधात पडळकरांनी दिला हक्कभंगाचा प्रस्ताव
- ‘..तरीही मोदींनी संभाजीराजेंना भेट द्यायलाच हवी’, राऊतांनी भाजपला पुन्हा डिवचले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
