Share

‘..तरीही मोदींनी संभाजीराजेंना भेट द्यायलाच हवी’, राऊतांनी भाजपला पुन्हा डिवचले

Published On: 

मुंबई : भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली ‘रोखठोख’ भूमिका जाहीर केली आहे. ५ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाने तीव्र संताप व्यक्त केला होता. मात्र, कोरोना संकटांच्या पार्श्वभूमीवर समाजाने संयम पाळावं असं आवाहन सर्वच नेत्यांनी केलं होतं.

मात्र, आता संभाजीराजे यांचा आज रौद्रावतार पाहायला मिळाला. समाजाच्या आरक्षणासाठी, त्यांच्या व्यथांसाठी आता तीव्र आंदोलन करणार असल्याची भूमिका संभाजीराजेंनी जाहीर केली आहे. दरम्यान, संभाजीराजे यांच्या मराठा आरक्षणाबाबतच्या भूमिकेबाबत शिवसेना नेते तथा खा.संजय राऊत यांना विचारण्यात आले. त्यावर त्यांनीही आरक्षणाच्या भूमिकेबाबत संभाजीराजेंच्या भूमिकेशी सहमत असल्याचे सांगितले.

राऊत म्हणाले, ‘संभाजीराजे हे महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. ते एक महत्वाचे नेते सुद्धा आहेत. मराठा आरक्षणाच्या भूमिकेशी आम्ही त्यांच्याशी सहमत आहोत. त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेतल्या. पण त्यांना खरी भेट ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यायला हवी. कारण मराठा आरक्षणाचा प्रश्न आता केंद्राच्या हातात आहे हे सुप्रीम कोर्टाच्या निकालातून स्पष्ट झालंय असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!