🕒 1 min read
मुंबई : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे. अशा सर्व भीषण परिस्थितीमध्ये देखील देशातील राजकारण जोरात सुरु आहे.
कोरोनाच्या या परिस्थितीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोरोना समजलाच नाही असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे.
राहुल गांधींच्या टीकेनंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राहुल गांधींसह काँग्रेसला प्रत्युत्तर दिलंय. ‘राफेल राफेल करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला, जनतेने अमेठीतून विकेट काढली. आता कोरोनावर स्वार होऊन सत्तेची स्वप्न बघतायत. सत्तेवाचून तडफड सुरू आहे. कितीही चिखल उडवला तरी देश मोदींच्या मागे खंबीर उभा आहे, तुम्ही महाराष्ट्राला रसातळाला नेणारा तीनचाकी खटारा तर सांभाळा,’ असा घणाघात अतुल भातखळकर यांनी केला आहे.
राफेल राफेल करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला,जनतेने अमेठीतून विकेट काढली.आता कोरोनावर स्वार होऊन सत्तेची स्वप्न बघतायत.सत्तेवाचून तडफड सुरू आहे.
कितीही चिखल उडवला तरी देश मोदींच्या मागे खम्बीर उभा आहे, तुम्ही
महाराष्ट्राला रसातळाला नेणारा तीनचाकी खटारा तर सांभाळा.@RahulGandhi— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 28, 2021
राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल –
‘सरकारला कोरोना संदर्भात अनेकदा सतर्क केलं होतं. मात्र सरकारने आमची चेष्टा केली. सरकारला व पंतप्रधानांना कोरोना समजलाच नाही. कोरोना केवळ एक आजार नाही, कोरोना हा बदलत असलेला आजार आहे. जेवढा वेळ तुम्ही त्याला द्याल, जेवढी जागा तुम्ही त्याला द्याल, हा तेवढाच घातक होत जाईल. मी मागेच म्हटलं होतं, जागा बंद करा. कोरोनाला तुम्ही वेळ देऊ नका, जागा देऊ नका, दरवाजा बंद करा’ असं यावेळी राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकार कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही राहुल यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची नौटंकी हेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं प्रमुख कारण आहे. अद्यापही त्यांनी कोरोनाला समजून घेतलं नाही. देशातील कोरोना मृत्यूदराची आकडेवारी खोटी असल्याचा आरोपही राहुल गांधींनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- येत्या १ जूनपासून जिल्ह्यातील उद्योगधंदे-बाजारपेठा सुरू कराव्यात – इम्तियाज जलील
- दिलासा…औरंगाबादेत पॉझिटिव्हीटी रेट २.२७ टक्क्यांपर्यंत खाली, तर रिकव्हरी रेट ९६.४० टक्क्यांवर!
- पुण्यातील लॉकडाऊनमध्ये मोठा बदल, राजेश टोपेंनी केली घोषणा
- ६ जूननंतर कोविड-बिविड बघणार नाही, आंदोलनात मी सर्वात पुढे असेल – संभाजीराजे
- ‘या’ शिधापत्रिकाधारकांना मिळणार ८ रुपये प्रतिकिलो गहू , तर १२ रुपये प्रतिकिलो तांदूळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
