🕒 1 min read
औरंगाबाद : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व एपीएल शेतकरी योजनेत समाविष्ट नसलेल्या औरंगाबाद जिल्हयातील एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक लाभर्थ्यांना ८ रुपये प्रतिकिलो दराने प्रतिव्यक्ती १ किलो गहू आणि १२ रुपये प्रतिकिलो दराने प्रतिव्यक्ती १ किलो तांदूळ वितरीत केला जाणार आहे. जून महिन्यात या अन्नधान्याचे वितरण केले जाणार असून औरंगाबाद जिल्हयामध्ये २,४०,५१४ शिधापत्रिकेतील १०,३६,८५६ लाभार्थी पात्र असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले यांनी दिली आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हयात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या काळात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत तसेच एपीएल (केशरी) शेतकरी योजनेत सहभागी नसलेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना जून महिन्यात सवलतीच्या दरात अन्नधान्य वितरणाचा निर्णय महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात आला आहे. रास्तभाव दुकानदारांकडे प्रथम मागणी करणारास प्रथम या तत्वानुसार धान्य वितरण केले जाईल तसेच धान्याचे वितरण करतांना रास्तभाव दुकानदारांमार्फत लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकेचा क्रमांक व त्यावरील पात्र सदस्यांची संख्या व शिधापत्रिकेवरील संपूर्ण तपशील याची नोंद स्वतंत्र नोंदवहीमध्ये स्वाक्षरीसह नोंद घेण्यात येईल.
लाभार्थ्यांना वितरणाकरिता औरंगाबाद जिल्हयामध्ये एकुण १२५.२९० मे.टन तांदुळ व १५५.२६ मे.टन गहू एवढे अन्नधान्य उपलब्ध असून एपीएल (केशरी) लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा .तसेच सदर योजनेबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार, शंका असल्यास त्यांनी संबंधित तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक, निरीक्षण अधिकारी किंवा तहसिलदार यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन वर्षाराणी भोसले , जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मोठ्या दु:खातून मोठं बळ मिळतं…’ रिया चक्रवर्तीच्या पोस्टवर अनेकांनी दिल्या प्रतिक्रिया
- ट्विटरला देशातील कायद्याचे पालन करावेच लागेल – केंद्र सरकार
- “राज्यसरकार व प्रशासन कोरोना रुग्णांची संख्या लपवत आहे, याचा भांडाफोड १ जूनला करणार”, आ. निलंगेकरांचा इशारा
- मोदींना अजून कोरोना समजलाच नाही ; राहुल गांधीचा टोला
- ‘मिर्झापूर’ मधील अभिनेता राजेश तैलंगवर आर्थिक संकट?; ‘रामलड्डू’ विकतानाचा फोटो व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
