मुंबई : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली ‘रोखठोख’ भूमिका जाहीर केली आहे. ५ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाने तीव्र संताप व्यक्त केला होता. मात्र, कोरोना संकटांच्या पार्श्वभूमीवर समाजाने संयम पाळावं असं आवाहन सर्वच नेत्यांनी केलं होतं.
मात्र, आता संभाजीराजे यांचा आज रौद्रावतार पाहायला मिळाला. समाजाच्या आरक्षणासाठी, त्यांच्या व्यथांसाठी आता तीव्र आंदोलन करणार असल्याची भूमिका संभाजीराजेंनी जाहीर केली आहे. ‘६ जून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आहे, जर ६ जून पर्यंत या पाच गोष्टींवर निर्णय झाला नाही तर पवित्र रायगडावरून आंदोलनाची सुरुवात करणार. सगळ्या आमदार खासदारांना घेऊन 6 जून ला उतरणार. 5 मे ला मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मी सगळ्यांना शांत ठेवलं, नाही तर महाराष्ट्र पेटला असता…आता ६ जूननंतर कोविड-बिविड बघणार हा संभाजी छत्रपती स्वतः आंदोलन करायला सर्वात पुढं असेल,’ असा निर्वाणीचा इशारा त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून दिला आहे.
काय आहेत ‘त्या’ ५ मागण्या ?
१) ९ सप्टेंबर 2020 च्या आधीच्या उमेदवारांना नियुक्ती देऊन टाका.
२) शाहू महाराजांच्या नावाने उभं केलेल्या सारथीसाठी कमीत कमी १ हजार कोटी द्यावे. मुख्यमंत्री म्हणाले जागा दिलीये, पण नुसतं जागा देऊन काय होणारे ? तिथं चांगली लोकं द्या…नाही तर रद्द करून टाका, असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला आहे.
३) अण्णासाहेब पाटील महामंडळाची पुन्हा उभारणी करा.
४) प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह तयार करा, हे राज्य सरकारच्या हातात आहे. ते तरी करा
५) ७० टक्के गरीब मराठा समाजाची चुक काय ? मराठा समाज देखील बहुजनांचा घटक त्यांनाही सवलती द्या !
महत्वाच्या बातम्या
- औरंगाबाद जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा विळखा होतोय घट्ट, आरोग्य यंत्रणेसमोर नवे आव्हान!
- दिलासा…औरंगाबादेत पॉझिटिव्हीटी रेट २.२७ टक्क्यांपर्यंत खाली, तर रिकव्हरी रेट ९६.४० टक्क्यांवर!
- पुण्यातील लॉकडाऊनमध्ये मोठा बदल, राजेश टोपेंनी केली घोषणा
- अखेर स्मार्ट सिटी बसला मिळाला मोबदला, १ कोटी ७० लाख आले, ८ लाख बाकी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

