Share

येत्या १ जूनपासून जिल्ह्यातील उद्योगधंदे-बाजारपेठा सुरू कराव्यात – इम्तियाज जलील 

Published On: 

औरंंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यासह जिल्ह्यात १४ एप्रिलपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील उद्योगधंदे, बाजारपेठा आदी ठप्प झाल्या असून मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे येत्या १ जून पासून जिल्ह्यातील सर्व उद्योगधंदे, बाजारपेठा सुरू कराव्यात अशी मागणी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने दुकानांना लावण्यात आलेले सील काढुन व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी देखील या पत्रात करण्यात आली आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यापारी, दुकानदार, टपरीधारक यांनी आपआपले उद्योगधंदे, बाजारपेठ व दुकाने बंद ठेवुन शासनाने ब्रेक द चैन अंतर्गत दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करुन सहकार्य करत आहे. दोन महिन्यापासून सर्व व्यापारी व दुकानदार यांनी आपापली आस्थापने बंद ठेवल्याने ते सध्या आर्थिक अडचणीत सापडलेले असुन शासनस्तरावरुन त्यांना आजतागायत कोणत्याही प्रकारचे आर्थिक पॅकेज किंवा मालमत्ता कर, विज बिल, जीएसटी या सरकारी करांमध्ये सुध्दा सवलत देण्यात आलेली नाही. औरंगाबाद शहरात व्यापारी अथवा दुकानदारांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर औरंगाबाद महानगरपालिका पथक, पोलीस विभागाचे पथक आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे पथक अशा वेगवेगळ्या तीन पथकांकडून कार्यवाही केली जात आहे. तिन्ही विभागाकडून करण्यात येणारी कायदेशिर व दंडात्मक कार्यवाही म्हणजे व्यापारी व दुकानदारांवर दहशत निर्माण करुन आत्महत्येस प्रवृत्त करणारी असल्याचे पत्रात नमुद केले आहे.

दरम्यान, कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरण्यास सुरूवात झाली असून गेल्या दोन महिन्याच्या काळात व्यापारी वर्गाचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले आहे. लवकरच पावसाळा सुरू होणार असून दुकानाची साफसफाई करणे, दुकानाची रिपेरिंग करणे आदी करणे आहे. त्यामुळे येत्या १ जून पासून जिल्ह्यातील उद्योगधंदे, बाजारपेठा, दुकाने आदी सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी खा. सय्यद इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!