Share

‘अगोदर एक व्हा, मग मराठा आरक्षणासाठी केंद्राकडेही जावू’, विखे पाटील यांची भूमिका

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर : सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मराठा समाजात अस्वस्थता पसरली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आता विसंगत विधाने करत आहेत. मराठा समाजाला गृहीत धरून त्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले नाही. आता एका व्यासपीठावर येऊन, सामूहिक नेतृत्वातून राज्य सरकारवर दबाव आणावा लागेल. वेळ पडल्यास केंद्र सरकारकडेही जाऊ. मात्र, सध्या तरी राज्य सरकारची भूमिका महत्त्वाचे आहे,” असे मत भाजपचे नेते तथा माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.

शिर्डी येथे त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून माध्यमांशी संवाद साधला. विखे पाटील म्हणाले, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाच्या नेत्यांनी व संघटनांनी एका व्यासपीठावरून पुढील लढा उभारायला हवा. आजपर्यंत कोणत्या सरकारने काय केले, न्यायालयात कोण कमी पडले, यावर टीका-टिप्पणी करण्यापेक्षा आरक्षणाच्या हक्काच्या मागणीसाठी पुढे कसे जाता येईल, याचा विचार व्हायला हवा.

कोर्टाच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेचे स्वागत करायला हवे. मात्र, राज्य सरकारनेही यासाठी गरजेची असलेली कायदेशीर प्रक्रिया विनाविलंब पूर्ण करावी. मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या सर्वांनी एकत्र आल्याशिवाय या लढ्याला बळ मिळणार नाही, असे विखे पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!