🕒 1 min read
मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. अशातच, पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याबाबत राज्य सरकारने जीआर काढल्यानंतर काँग्रेस पक्ष हा नाराज झाला आहे. काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीची वेळ मागितली असून अद्याप ही भेट होऊ शकलेली नाही.
अशातच, तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना मदत, लसीकरण, कोरोना काळातील भ्रष्टाचार, मराठा आरक्षण आदी मुद्द्यांवरून भाजप देखील आक्रमक झाला असून महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. अशा काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चहुबाजुंनी कोंडी होत असल्याचं चित्र निर्माण झालं होतं.
मात्र, आजारपणातून ठीक झालेल्या शरद पवार यांनी तब्बल महिन्याभरानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. महाविकास आघाडीचे शिल्पकार असलेल्या शरद पवार यांनी भेट घेतल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. या भेटी मागील नेमकं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
दरम्यान, या भेटीनंतर राज्याचे नगरविकास मंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पवारांचं कौतुक केलं आहे. ‘पवारांचं नुकतच ऑपरेशन झालं. कोरोनाचं वातावरण आहे. अशा परिस्थितीतही लोकांच्या समस्या घेऊन ते मुख्यमंत्र्यांकडे आले. त्यामुळे पवारांना माझा सॅल्यूटच आहे,’ असं शिंदे म्हणाले. तसेच, पवार-मुख्यमंत्र्याची भेट नेमकी कशाबाबत झाली हे मला माहीत नाही. पण विकास कामांच्या मुद्द्यावर पवार नेहमी भेटतात, त्यानुषंगानेच ही भेट असावी, असं भाष्य देखील एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पदोन्नती आरक्षणावरून महाविकास आघाडीत धुसफूस; काँग्रेस सरकारमधून बाहेर पडण्याच्या तयारीत
- डॉक्टरांविषयी ‘ते’ वक्तव्य अंगलट; IMA कडून बाबा रामदेव यांना १ हजार कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस
- अर्धे कोविड केअर सेंटर बंद झाल्यानंतर विभागीय पथकाचा हा ‘विशेष’ अहवाल आला समोर!
- ‘राज्यकर्त्यांनी राजकारण सोडून मराठा समाजासाठी एकत्र यावे’, खा.संभाजीराजेंचे आवाहन
- मराठा समाजाला न्याय मिळावा हीच आपली भूमिका-खा.संभाजीराजे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
