Share

होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप गावपुढाऱ्याच्या अंगलट, बीडमध्ये पोलिसांत तक्रार

Published On: 

🕒 1 min read

बीड : वडवणी तालुक्यातील खळवट निमगावमध्ये एका गावपुढाऱ्याने कोरोनापासून बचावासाठी उपयुक्त म्हणून काही होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप केले. पण, हे वाटप त्याच्या अंगलट आले. याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार अर्ज दिला आहे.

वडवणी तालुक्यातील खळवट निमगावमध्ये सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. गावात काही रुग्ण सापडले आहेत. हे गाव सध्या कंटेनमेंट झोन करण्यात आले आहे. दरम्यान, या गावातील कार्यकर्ते राहुल पांडुरंग आंबुरे यांनी गावात होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप केले. एका छोट्या बॉटलमध्ये साबुदाण्यासारख्या या गोळ्या आहेत. दरम्यान, कुप्पा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय ठोकरे यांनी याबाबत आक्षेप घेत पोलिसांत तक्रार दिली आहे.

आरोग्य विभागाची पूर्व परवानगी न घेता गोळ्यांचे वाटप केले, या गोळ्यांवर कंपनीचे लेबल, उत्पादन दिनांक, मुदतबाह्य दिनांक, बॅच नंबर असा कशाचाही उल्लेख नसल्याने योग्य ती कारवाई करावी, असे तक्रारीत म्हटले आहे. आता पोलीस काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!