Share

आरक्षण हक्काचं…! मुख्यमंत्री ठाकरेंसह चव्हाणांविरोधात मेटेंची उच्च न्यायालयात याचिका !

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा नेत्यांनी बैठका घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जात असल्याचं सांगितलंय. तर, दुसरीकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या भूमिकेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील रंगले आहेत.

तर, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला असून कोणत्याही परिस्थितीत ५ जून रोजी आरक्षणासाठी मोर्चा काढणार असा निर्धार केला आहे. आता मूक नाही तर बोलका मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, मोर्चाचा इशारा दिल्यानंतर आता विनायक मेटे यांनी राज्य सरकारची आणखी एका बाजूने कोंडी केल्याचं दिसून येतंय

आज विनायक मेटे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अशोक चव्हाण यांनी गंभीर आरोप केले होते. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच आरक्षण रद्द झाल्याचं मेटे म्हणाले होते. त्यामुळेच मेटेंनी आता न्यायालयीन लढा देण्यास सुरुवात केली आहे.

विनायक मेटेंनी याचिका का दाखल केली ?

५ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाज हा खुल्या गटात आला. तर जो समाज आरक्षणात येत नाही अशांसाठी केंद्र सरकारने EWS (आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक) आरक्षणाची तरतूद केली आहे. त्यामुळे आम्ही मराठा समाजाला तात्काळ EWS लागू करा अशी मागणी अशोक चव्हाणांकडे केली. मराठा आरक्षणाबाबत पुढील कार्यवाही होईपर्यंत विद्यार्थ्यांचं व समाजाचं होणार नुकसान रोखण्यासाठी आम्ही EWS ची मागणी केली होती.

मात्र, गेल्या १५-२० दिवसांमध्ये राज्य सरकारने याबाबत काहीच हालचाल केलेली नाही. एक ओळीचा जीआर लावून मराठा समाजाला EWS लागू करता येईल, मात्र ते सुद्धा यांनी केलेलं नाही. त्यामुळेच मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्याविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे,’ अशी माहिती विनायक मेटे यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!