Share

आई-वडिलांची भेट अधुरीच राहिली… मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात; जीएसटी उपायुक्तांचा मृत्यू

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर आज(दि.25) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. एका भरधाव इनोव्हा गाडीने पुढे जात असलेल्या ट्रकला मागून जोरदार टक्कर दिली. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, हा अपघात इतका भीषण होता की, इनोव्हा गाडीचा अक्षरशः चुरा झाला आहे.

हा अपघात आज सकाळी आठच्या सुमारास झाला. अभिजित घवले त्यांच्या आई-वडिलांना भेटायला चालले होते. मात्र, तिथे पोहोचण्याआधीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. अभिजीत घवले (जीएसटी डेप्युटी कमिशनर) यांच्यासह त्यांचे साडू शंकर गोडा यतनाल यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. तर घवले यांच्या पत्नी व चालक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सोमाटणे येथील पवना हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत घवले यांच्या आई-वडिलांचा लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे अभिजित घवले हे त्यांची पत्नी, साडू व चालक हे इनोव्हा कारने लातूरला गावी चालले होते. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मुंबईहून पुण्याकडे जात असताना घवले यांच्या इनोव्हा कारचे कामशेत बोगद्यात समोरील टायर फुटला आणि भरधाव वेगात असलेली कार पुढे जाणाऱ्या ट्रकवर आदळली.अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

घवले हे त्यांच्या आई-वडिलांना भेटायला चालले होते. या दुर्घटनेमुळे त्यांची आई-वडिलांची भेट अधुरीच राहिली. या भीषण अपघातामुळे घवले कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. घवले यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!