🕒 1 min read
मुंबई : नेट फ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील बहुप्रतिक्षीत वेब सिरीजच्या आखेरच्या भागाची तारीख सोमवार २४ मे रोजी जाहीर करण्यात आली आहे. आखेरचा भाग हा दोन भागामध्ये प्रदर्शीत होणार आहे. जगभरात या सिरीजच्या भागाची आतुरतेने वाट बघणाऱ्या प्रेक्षकांची प्रतिक्षा अखेर संपली आहे.
मनी हाईस्ट चा आखेरचा सिझन हा दोन भागात प्रदर्शित होणार आहे. यातील पहिला भाग हा ३ संप्टेंबर २०२१ रोजी प्रदर्शित होईल तर दुसरा भाग हा तीन महिन्यांच्या कालावधीनंतर म्हणजे ३ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्सने या शोचा टिझरही प्रदर्शित केला आहे. या टिझरमध्ये बॅंक ऑफ स्पेनमध्ये पोलिसांनी प्रोफेसर सर्जिनो मार्क्युना आणि त्याच्या टिमला चहुबाजुनी वेढा घातलेला असतो. आणि पोलिस त्यांच्यावर गोळीबार करत असतात.
https://www.instagram.com/p/CPQiV4InF_W/
मुळ स्पॅनिश भाषेच बनलेल्या मनी हाईस्ट या शोचे पहिला चार भाग तुफान लोकप्रिय झाले आहेत. या शोमध्ये चोरी करताना वापरलेले मास्कचा ट्रेंड जगभरात पसरला आहे. तसेच बेला चाओ हे गाणेही तुफान लोकप्रिय झाले आहे. सर्वस्व गमावलेला फ्रोफेसर विविध प्रकारची क्षमता असलेल्या आठ लोकांना एकत्र आणतो. आणि मग सुरु होतो थरार असे या कार्यक्रमाचे कथानक आहे. लक्षवेधी चोरीच्या प्रकाराने या शोने जगाला वेड लावले आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुढील जन्मावर भाष्य करणाऱ्या युवराजला कैफचे मन जिंकणारे उत्तर
- चंद्रकांत पाटलांचे ‘ते’ विधान मराठा आरक्षण संघर्षातील शहिदांचा अपमान करणारे – कॉंग्रेस
- दिलासा! म्यूकरमायकोसिसवरील उपचार सरकारी योजनेतूनच होणार
- आकडेवारी जाहीर ; देशात आतापर्यंत तब्बल ‘इतक्या’ लोकांचे झाले लसीकरण
- ‘मोदींच भावनिक होणे आणि डोळ्यातले अश्रू म्हणजे ठरवून केलेला कार्यक्रम’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
