🕒 1 min read
ढाका : श्रीलंकेचा संघ सध्या बांग्लादेशच्या दौऱ्यावर आहे. रविवारी २३ मे रोजी दोन्ही संघात पहिला एकदिवसीय सामना पार पडला. या सामन्यात बांग्लादेशने श्रीलंकेचा ३३ धावानी पराभव करत मालिकेची सुरुवात विजयाने केली. बांग्लादेशने दिलेल्या २५८ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपुर्ण संघ २२४ धावापर्यंत मजल मारु शकला. ३४ धावांत ३ गडी बाद करणाऱ्या मुस्तफिजुर रहमानला सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. या विजयासह बांग्लादेशने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात २५८ धावाच्या लक्ष्याचा बचाव करताना बांगलादेशच्या गोलंदाजांनी चमकदार कामगीरी केली होती. या सामन्यात बांग्लादेशचा खेळाडू मेंहदी हसनने पाकिस्ताचा माजी वेगवान गोलंदाज वसीम आक्रमच्या एका खास विक्रमाची बरोबरी केली आहे. या सामन्यात हसनने १० षटकात केवळ ३० धावा देत ४ गडी बाद केले. मात्र ४ गडी बाद करणे जरी सामान्य असले तरी या चार पैकी तीन गडी हे त्रिफळाचीत केले तर चौथा गडी त्याने स्वत:च्या गोलंदाजीवर झेल पकडत घेतला. तसेच सामन्यात त्याने ३ झेल घेतले.
असा कारनामा यापूर्वी पाकिस्तान संघाचा माजी खेळाडू वसीम अक्रमने केला होता. श्रीलंका संघाविरुद्ध १९९९ मध्ये हा कारनामा अक्रमने केला होता. भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका या तिन संघात त्यावेळी तिरंगी मालिका खेळवण्यात आली होती. या मालिकेत अक्रमने ३ गडी बाद केले होते. हे तीनही फलंदाज अक्रमने त्रिफळाचीत केले होते. तसेच ३ झेल देखील टिपले होते. या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर पाकिस्तान संघाने हा सामना ९ गडी राखून जिंकला होता. हीच कामगीरी मेंहदी हसनने श्रीलंकेविरुद्ध केली. आणि योगोयोग असा की दोन्ही वेळेस विरोधी संघ हा श्रीलंकाच होता.
महत्वाच्या बातम्या
- अखेर प्रतिक्षा संपली! मनी हाईस्ट च्या आखेरच्या भागाची प्रदर्शनाची तारीख जाहिर
- पुढील जन्मावर भाष्य करणाऱ्या युवराजला कैफचे मन जिंकणारे उत्तर
- चंद्रकांत पाटलांचे ‘ते’ विधान मराठा आरक्षण संघर्षातील शहिदांचा अपमान करणारे – कॉंग्रेस
- दिलासा! म्यूकरमायकोसिसवरील उपचार सरकारी योजनेतूनच होणार
- आकडेवारी जाहीर ; देशात आतापर्यंत तब्बल ‘इतक्या’ लोकांचे झाले लसीकरण


