Share

इंग्लंड दौऱ्यात विराट कोहली ‘हे’ दोन विक्रम नक्कीच नावावर करणार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतातील कोरोना परिस्थीतीमुळे आयपीएल स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करण्यात आली. ही स्पर्धा अर्ध्यातच स्थगित झाल्याने अनेक क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड झाला. यानंतर क्रिकेट रसिकांचे लक्ष हे जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेच्या आंतिम सामन्याकडे लागले. या सामन्यानंतर भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध संप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये ५ कसोटी सामन्याची मालिका खेळायची आहे.

या मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली दोन विक्रमाच्या अगदी जवळ पोहचला आहे. यातील पहिला विक्रम आहे. भारताकडून सर्वाधिक कसोटी सामन्यात नेतृत्व करण्याचा विक्रम. विराटने आतापर्यंत भारताकडून ६० सामन्यात कर्णधारपद भूषवले आहे. तर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने पण ६० सामन्यात नेतृत्व केले आहे. यामुळे जेव्हा विराट कोहली जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळायला उतरेल तेव्हा भारताकडून सर्वाधीक कसोटी सामन्यात नेतृत्व करणारा कर्णधार बनेल. जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेच्या अंतिम सामना हा विराटचा कर्णधार म्हणून ६१ वा कसोटी सामना असेल.

तर जागतीक कसोटी सामन्यात सर्वाधीक विजय मिळवण्याच्या यादीत विराट कोहलीला क्लाईव्ह लॉईड यांना मागे टाकण्याची संघी आहे. विराट कोहली सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याच्या यादीत क्लाईव्ह लॉईड यांच्यासह संयुक्तरित्या चौथ्या क्रमांकावर आहे. लॉईड यांनीही कर्णधार म्हणून ३६ सामने जिंकले आहेत. तेव्हा भारताने या इंग्लंड दौऱ्यात एकाही सामन्यात विजय मिळवला तरी विराट या यादीत लॉईड यांना मागे टाकेल. या यादीत दक्षिण अफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ पहिल्या क्रमांकावर असुन त्याने सर्वाधीक ५३ कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर रिकी पॉटिंग (४८) आणि तिसऱ्या क्रमांकावर स्टिव्ह वॉ(४१) हे आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!