Share

चंद्रकांत पाटलांचे ‘ते’ विधान मराठा आरक्षण संघर्षातील शहिदांचा अपमान करणारे – कॉंग्रेस

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असून राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील होताना दिसत आहेत. ‘मराठा आरक्षण हा राज्य सरकारच्या अखत्यारीतील विषय असल्याचं वाटल्यानं पंतप्रधान मोदी हे संभाजीराजेंना भेटले नाहीत’, असं काल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. या खुलाशावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे.

महाराष्ट्रातील बॉलिवूडबद्दल मोदींना अधिक माहिती आहे पण मराठा आरक्षणाबाबत त्यांना माहिती नाही हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे मराठा आरक्षणासाठी ५८ मोर्चे काढून इतिहास रचणा-या आंदोलकांच्या जखमांवर मीठ चोळणारे तसेच मराठा आरक्षणासाठी शहिद झालेल्यांचा घोर अपमान करणारे आहे. चंद्रकांत पाटील हे मनकवडे आहेत असे दिसते. मनकवड्या चंद्रकांत पाटील यांनी मोदींना मराठा आरक्षण राज्याचा विषय वाटल्याने संभाजीराजे यांना मोदींनी भेट दिली आहे असे म्हटले आहे.त्यांच्या वक्तव्यातून त्यांनी तीन गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. मोदींची विषयांची समज फार कमी आहे. मोदींना मराठा आरक्षण हा विषय समजलाच नाही आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या नावातील छत्रपती या उपाधीची केवळ मतांकरिता वापरण्या इतपतच मोदींच्या लेखी किंमत आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षण प्रश्नावर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चारवेळा भेटण्याची वेळ मागितली परंतु आजपर्यंत मोदींनी त्यांना वेळच दिली नाही. चित्रपट अभिनेत्री प्रियांका चोप्रा, कंगना राणावत व इतर बॉलिवूड अभिनेत्यांना भेट देतात. या सर्व तारकांचे कोणते गहन प्रश्न होते त्यांना मोदींनी वेळ दिला आणि मराठा आरक्षणाकरिता भेट मागणाऱ्या छत्रपती संभाजीराजेंना भेटायला त्यांच्याकडे वेळ नाही. संभाजीराजेंना भेट न देणे हा महाराष्ट्राचा अवमान आहे. नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला छत्रपतींची आठवण केवळ निवडणुकीच्या वेळीच येते का, असा देखील सचिन सावंत यांनी विचारला आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा केंद्र सरकारच्या अखत्यारित असतानाही भाजपाकडून त्यावर राजकारण केले जात आहे. राज्य सरकारवर सर्व ढकलून राज्यातील भाजपा नेते नरेंद्र मोदी यांचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुळात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची विचारधारा ही आरक्षणविरोधी आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी जर भाजपाची प्रामाणिक इच्छा असती तर पाच वर्ष महाराष्ट्रात तसेच केंद्रातही सत्ता असताना ‘फुलप्रुफ’ आरक्षण देता आले असते पण सर्वोच्च न्यायालयाने फडणवीस सरकारने दिलेले आरक्षण किती ‘फुलप्रुफ’ होते हे दाखवून दिले आहे, असेही सावंत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!