उस्मानाबाद: पहल्या लाटेपेक्षा कोरोनाची दुसरी लाट जास्त वेगाने पसरत आहे. अनेक रुग्णांची परिस्थिती देखील चिंताजनक आहे. या लाटेमध्ये रोज अनेकांचे जीव या कोरोनामुळे जात आहेत, अशी भीषण परिस्थिती झालेली असताना मात्र वैद्यकीय सुविधांचा देखील तुटवडा भासत आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे ऑक्सिजन देखील जास्त लागत आहे. अशा वेळेस भूम तालुक्यातील रुग्णालयांना गॅस वेल्डिंग दुकानांमधून ऑक्सिजन सिलिंडर पुरवावे लागत आहेत.
भूम तालुक्यामध्ये ७४९ अॅक्टिव्ह कोरोना पेशंट आहेत. तसेच ग्रामीण रुग्णालय मध्ये ३० ऑक्सिजन बेड आहेत. रुग्णालयामध्ये ३७ कोरोना पेशंट उपचार घेत आहेत तर ग्रामीण रुग्णालयामध्ये २४ ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध आहेत हे सिलिंडर सात दिवस रुग्णांसाठी वापरले जातात. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी संदीप जोगदंड यांनी महसूल प्रशासनाकडे वीस ऑक्सीजन सिलिंडरची मागणी केली होती. कोरोना रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडरची गरज या लाटेमध्ये जास्त लागत आहे.
त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार भूम तहसीलदार उषाकिरण शृंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने बावी, पाथरूड, भूम शहर या भागातून गॅस वेल्डिंग दुकानदाराकडून १९ सिलिंडर अधिग्रहित केले आहेत. या पथकामध्ये तहसीलदार उषाकिरण शृंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार सावंत, पाथरूडचे तलाठी संकेत काळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. तहसीलदार यांच्या या धाडसी कारवाईमुळे ग्रामीण रुग्णालयाला १९ ऑक्सिजन सिलिंडर मिळाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षण : संभाजीराजेंच्या महाराष्ट्र दौऱ्याची कोल्हापुरातून सुरुवात !
- काँग्रेस पक्षाला गृहित धरू नका, आम्ही तुमचे नोकरदार नाहीत, नितीन राऊत यांचा हल्लाबोल
- उमारगयात पुन्हा नियमांचे उल्लंघन; ४३ हजाराचा दंड वसूल!
- सचिनने खराब गोलंदाजी करायला सांगितल्याचा पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूचा खळबळाजनक दावा
- ‘भारतीय संघात शार्दूलला अष्टपैलू खेळाडू म्हणून जागा मिळावी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
