Share

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मिळणार ‘उभारी’!

Published On: 

औरंगाबाद : उभारी २.० या उपक्रमांतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात येत आहे. भविष्यातील नियोजनासाठी जिल्ह्यातील २०१५ ते २०२० या कालावधीत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांनी दिले आहेत. तहसीलदार आणि नायब तहसीलदार आपल्या क्षेत्रातील अहवाल सादर करणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात जाधवर यांनी तहसीलदार व नायब तहसीलदारांची ऑनलाईन संवाद साधला.

यावेळी तहसीलदार वैशाली डोंगराळ उपस्थित होत्या. या बैठकीत जाधवर यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी सर्वेक्षणातील संभाव्य अडचणी व उपाय योजनांवर चर्चा केली. हा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शेतकरी आत्महत्या बाबत संवेदनशील राहून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना सामाजिक, आर्थिक, स्थैर्य देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी होईल. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे सर्वेक्षण करून त्यांना विविध योजनांचा लाभ दिल्यास त्यांना उभारी मिळेल.

असे जाधवर म्हणाले. राज्य शासन मृत शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपये सानुग्रह अनुदान देत आहे. शेतकरी कुटुंबीयांची भेट घेऊन सामाजिक व आर्थिक स्थितीविषयी माहिती संकलित करणे, शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी नियोजन करणे आणि भविष्यातील नियोजनामध्ये नवीन उपाययोजनांचा समावेश करणे. हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्टे आहेत.

जिल्ह्यातील सर्व तालुकानिहाय पाच वर्षाच्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या आढावा घेण्यात आला आहे. यात औरंगाबाद येथे ७६,फुलंब्री १००, पैठण १५५, सिल्लोड १५४, सोयगाव ६४, कन्नड ११३, खुलताबाद ४२, वैजापूर ६८, गंगापूर ६७,अप्पर तहसील कार्यालय १ असे एकूण ८४० आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत. तहसील कार्यालयात जमा झालेल्या माहितीचे विश्लेषण करून शेतकऱ्यांच्या कुटुंबास कोणता योजनांचा लाभ देता येईल हे निश्चित केले जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!