🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल एकदिवसाचा कोकण दौरा केला. तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांची त्यांनी पाहणी केली. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते हे देखील कोकणामधील नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून आढावा घेत आहेत. तर, कोकणाला मदत देण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. याच्यात आता मनसेनेही उडी घेतली आहे.
उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावर मनसेचे सरचिटणीस आणि नेते संदीप देशपांडे यांनी उपरोधिक टोला लगावला आहे. ‘चक्री वादळाला लाजवेल असा तुमच्या दौऱ्याचा वेग होता. पुराणकाळात देवी देवता वगैरे मनोवेगाने फिरायचे तसे तुम्ही फिरलात’ असे संदीप देशपांडेंनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.
मुख्यमंत्री साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे, चक्री वादळाला लाजवेल असा तुमच्या दौऱ्याचा वेग होता. पुराणकाळात देवी देवता वगैरे मनोवेगाने फिरायचे तसे तुम्ही फिरलात. खरच BEST C M.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) May 22, 2021
पंचनामे पूर्ण होताच मदती संदर्भात निर्णय घेणार असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकण दौऱ्यात दिले. ‘मी वैफल्यग्रस्त नाही, मी येथे दुःख जाणून घ्यायला आलो आहे. दिलासा देण्यासाठी आलो आहे. फोटोसेशनसाठी नाही’ असा सणसणीत टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
तर दुसरीकडे, उद्धव ठाकरेंनी केवळ तीन तासातच आपला दौरा आटोपता घेतल्यामुळे भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. ‘उद्धव ठाकरे हे कोकणात जाण्यासाठी घराबाहेर पडले. मात्र, कपड्याची इस्त्रीही मोडून न देता ते मुंबईत परतले. याउलट एकनाथ शिंदे यांनी कोकणवासियांना मदत तरी पाठवली. त्यासाठी मी शिंदे यांचे आभार मानतो. बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक कसा असतो, हे त्यांनी दाखवून दिले. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडून काहीतरी शिकावे, हा माझा मैत्रीपूर्ण सल्ला आहे,’ असं देखील नितेश राणे यांनी आवर्जून नमूद केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मंत्री अनिल परबांच्या बांधकामाबाबत अहवाल मागवणार’, भाजपच्या शिष्टमंडळाला राज्यपालांचे आश्वासन
- राजीव गांधींच्या मारेकऱ्यांच्या सुटकेसाठी मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे राष्ट्रपतींना पत्र
- ‘आता राष्ट्रपती, पंतप्रधानांसाठी बेड्स राखीव ठेवण्याची गरज’, दिल्ली हायकोर्टाचे मत
- मोदी सरकार ‘ट्विटर’च्या भूमिकेवर नाराज, एकतर्फी निर्णय न घेण्याचा सल्ला
- सातव कुटुंबीयांच्या सांत्वनास राहुल गांधी हिंगोलीला येणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

