Share

राजीव गांधींच्या मारेकऱ्यांच्या सुटकेसाठी मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे राष्ट्रपतींना पत्र

Published On: 

चेन्नई : माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्याकांडातील सात प्रमुख आरोपींना ठोठावलेली आजन्म कारावासाची शिक्षा माफ करून त्यांची तत्काळ सुटका करण्याची मागणी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी राष्ट्रपतींकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी गुरुवारी राष्ट्रपतींना पत्र लिहिले. २०१८ साली राज्य सरकाने केलेल्या शिफारशीचा स्वीकार करण्याची विनंती स्टॅलिन यांनी पत्राद्वारे कोविंद यांच्याकडे केली आहे.

राजीव गांधी हत्याकांडातील आरोपी तीन दशकांपासून कैदेत असून त्यांना कष्ट सहन करावे लागत असल्याने त्यांच्या सुटकेची मागणी राज्यसरकारकडून करण्यात येत आहे. बहूतांश राजकीय पक्षांकडून आरोपींची शिक्षा माफ करून त्यांची सुटका करण्याची मागणी होत आहे.

या आरोपींची सुटका व्हावी हीच तामिळनाडूच्या लोकांचीदेखील मागणी असल्याचे या पत्रात मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी नमूद केले आहे. २१ मे १९९१ मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या झाली होती. या प्रकरणी व्ही. श्रीहरण ऊर्फ मुरूगन, त्याची पत्नी नलिनी, संथन, एजी पेरारिवलन, जयाकुमार, रॉबर्ट पेयास व पी. रविचंद्रन या सात जणांना दोषी ठरण्यात आले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!