हिंगोली : काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्य निधनामुळे शोककळा पसरली आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी पुढील आठवड्यात हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाने शुक्रवारी (दि.२१) कळमनुरी येथे सुरक्षा व्यवस्थेबाबत पाहणी केली. याबाबत ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रकाशित केले आहे.
काँग्रेसचे खासदार राजीव सातव हे खासदार राहुल गांधी यांचे निकटवर्तीय होते. अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या माध्यमातून खासदार सातव यांनी युवकांची फळी जोडण्याचे काम केले. त्यांच्या कामाची हातोटी लक्षात घेता खासदार सातव यांच्यावर गुजरात काँग्रेसच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवली होती.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी खासदार सातव यांचे निधन झाले. सातव कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करण्यासाठी खासदार राहुल गांधी २४ किंवा २५ मे रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात पोलिस विभागाशी संपर्क साधला असता खासदार राहुल गांधी यांचा अधिकृत दौरा आला नसला तरी या दोन दिवसांत संभाव्य दौरा असल्याचे सांगण्यात आले आहे.
राहुल गांधींचे ‘जिवलग’
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी राजीव सातव यांच्यासाठी पूर्वनियोजन नसताना सभा घेतली होती. २०१४ च्या मोदी लाटेतही राजीव सातव हे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीचे प्रभारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे २०१९ ची लोकसभा निवडणूक ते लढले नाहीत. परंतु राज्यसभेत हुसेन दलवाई यांची जागा रिक्त होताच राहुल गांधी यांनी सातव यांची त्या जागी निवड करत त्यांना वरच्या सभागृहात पाठवले. संसदेत भाजपच्या विरोधात आक्रमकपणे बोलणाऱ्या काँग्रेसच्या यंग ब्रिगेडचे ते महत्त्वाचे वक्ते मानले जात होते. लोकसभेत खासदार म्हणून त्यांची कामगिरी चांगली आहे असे कॉंग्रेसचे वरिष्ठ व ज्येष्ठ नेते मानतात.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘म्यूकरमायकोसिसचा खर्च महात्मा फुले योजनेत समाविष्ट करा’, खंडपीठाचे सरकारला आदेश
- तेजपाल निकालाविरोधात गोवा सरकार कोर्टात जाणार-मुख्यमंत्री सावंत
- एसटी महामंडळाचे छुपे खासगीकरण? भाडेतत्त्वावर घेणार तब्बल ५०० बस
- ‘तुम्ही आमचा अपमान करत आहात’, संजय राऊतांचा राज्यपालांच्या भूमिकेवर संताप
- दहावीच्या परीक्षा रद्द करण्यावरून उच्च न्यायालयाने फटकारलं; मुख्यमंत्री म्हणाले…


