Share

मोदी सरकार ‘ट्विटर’च्या भूमिकेवर नाराज, एकतर्फी निर्णय न घेण्याचा सल्ला

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : काँग्रेसच्या कथित ‘टूलकिट’ प्रकरणी ट्विटरने भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांच्या काही ट्विट्सला ‘मॅनिपुलेटेड मीडिया’चा टॅग लावल्यामुळे केंद्र सरकार चांगलेच नाराज झाले आहे. केंद्राने याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे नमूद करत ट्विटरला एकतर्फी निर्णय न घेण्याचा सल्ला दिला आहे.

भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसच्या कथित टूलकिटसंबंधी नुकतेच एक ट्विट केले होते. पण या ट्विटमधील सामग्री खोडसाळ असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ट्विटरने त्यांच्या ट्विटला मॅनिपुलेटेड मीडियाचा टॅग लावला होता. यामुळे सत्ताधारी भाजपच्या गोटात एकच खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर केंद्राने ट्विटरला चौकशी सुरू असताना एकतर्फी निर्णय न घेण्याचा सल्ला दिला आहे.

‘ट्विटरने भारतीय राजकारण्यांनी केलेल्या ट्विटसाठी मॅनिपुलेटेड मीडिया टॅगचा वापर करू नये. याप्रकरणी संबंधित पक्षाने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, सध्या त्याची चौकशी सुरू आहे,’ असे केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाने ट्विटरच्या ग्लोबल टीमला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. ‘एकीकडे सरकारी तपास यंत्रणा चौकशी करत आहे तर दुसरीकडे ट्विटर मॅनिपुलेटेड मीडियाचा टॅग लावून चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच एकतर्फी निर्णय घेत आहे. त्यांचा हा निर्णय पूर्वग्रहदूषित आहे. ते या प्रकरणाच्या चौकशीला नवा रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. ट्विटर याप्रकरणी मध्यस्थ किंवा पंच होण्याच्या प्रयत्नांत आहे,’ असे मंत्रालयाने म्हटले आहे.

‘ट्विटरचा निर्णय तटस्थपणे चालणाऱ्या चौकशीला प्रभावित करणारा व एकतर्फी असून, यामुळे त्याची विश्वासार्हता कमी झाली आहे,’ असेही केंद्राने आपल्या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, ट्विटरवर चुकीची माहिती, फोटो, व्हिडिओ किंवा अन्य सामग्री ट्विट करणाऱ्या व्यक्तीच्या ट्विटसाठी ‘मॅनिपुलेटेड मीडिया’चा टॅग वापरला जातो. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनेक ट्विट्सना असा टॅग लावण्यात आला होता. त्यानंतर ट्रम्प यांचे खाते कायमस्वरुपी बंदही करण्यात आले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!